News Flash

दिल्ली कॅपिटल्सच्या अमित मिश्राला करोनाची लागण

करोनामुळे आयपीएलचा १४वा हंगाम स्थगित

अमित मिश्रा

देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असताना आयपीएललाही त्याचा फटका बसला आहे. यंदाचा लीगचा १४वा हंगाम स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी कोलकाता संघाच्या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्यानंतर बंगळुरुसोबत होणारा सामना पुढे ढकलावा लागला. दरम्यान चेन्नईच्याही तिघांना करोनाची लागण झाली आहे. त्यानंतर मंगळवारी हैदराबादचा वृद्धिमान साहा यालाही करोनाची लागण झाल्याचे समोर आले. आता दिल्ली कॅपिटल्सच्या महत्वाच्या खेळाडूला करोनाने ग्रासले आहे.

दिल्लीचा स्टार फिरकीपटू अमित मिश्राला करोनाची लागण झाली. कोलकाताने दिल्लीविरुद्ध सामना खेळला होता, यात करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या कोलकाताच्या वरुण चक्रवतीने प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवले होते. या सामन्यानंतर मिश्राला करोनाची लागण झाली आहे.

चेन्नईच्या तीन सदस्यांना करोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी बुधवारी राजस्थानविरोधात होणारा सामना आपण खेळू शकणार नसल्याचे बीसीसीआयला कळवले होतं. जोपर्यंत पॉझिटिव्ह आढळलेल्या सदस्यांच्या संपर्कात आलेले सर्व खेळाडू तिन्ही चाचण्यांमध्ये निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत मैदानात उतरण्यास इच्छुक नसल्याचं चेन्नई संघाने बीसीसीआयला कळवले होते. नियमाप्रमाणे यासाठी सहा दिवसांचा कालावधी लागणार होता.

आयपीएलचे आतापर्यंत २९ सामने खेळले गेले आहेत. गुणतालिकेत दिल्लीचा संघ अव्वल स्थानी आहे. तर चेन्नई दुसऱ्या, बंगळुरु तिसऱ्या, मुंबई चौथ्या, राजस्थान पाचव्या, पंजाब सहाव्या, कोलकाता सातव्या आणि हैदराबादचा संघ आठव्या स्थानावर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 4:11 pm

Web Title: delhi capitals spiner amit mishra tests positive for covid 19 adn 96
Next Stories
1 आयपीएल स्थगित; बीसीसीआयचं ‘इतक्या’ कोटीचं नुकसान होण्याची शक्यता
2 इतकी कडक सुरक्षा व्यवस्था असताना IPLमध्ये करोना पसरला कसा?
3 IPL 2021: …म्हणून स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय; आयपीएलचं स्पष्टीकरण
Just Now!
X