लंडन : मँचेस्टर युनायटेडला इंग्लिश प्रीमियर लीगच्या पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. दुबळ्या क्रिस्टल पॅलेसने युनायटेडला ३-१ असे पराभूत केले. एडी नके तिया याने अखेरच्या क्षणी केलेल्या गोलमुळे आर्सेनलने वेस्ट हॅम युनायटेडला २-१ असे हरवत दुसऱ्या विजयाची नोंद केली.

युरोप लीगच्या उपांत्य फेरीत सेव्हिलाकडून पराभूत झाल्यानंतर युनायटेडला करोनाचे ग्रहण लागले. त्यांचा अव्वल खेळाडू पॉल पोग्बा याला करोनाची लागण झाली. युवा आघाडीवर मसोन ग्रीनवूड याने करोनाविषयक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्याला वैयक्तिकपणे सराव करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांमुळे युनायटेडचे प्रशिक्षक ओले गनर सोलस्कायर यांना अनेक महत्त्वाच्या खेळाडूंविनाच खेळावे लागले. क्रिस्टल पॅलेसकडून विल्फ्रेड झाहाने दोन तर आंद्रोस टाऊनसेंड याने एक गोल करत विजयात योगदान दिले.

ला-लीगा फुटबॉल : सेल्टा व्हिगोची व्हॅलेंसियावर मात

’ इयागो अस्पास याच्या दोन गोलमुळे सेल्टा व्हिगोने ला-लीगा फुटबॉलमध्ये व्हॅलेंसियावर २-१ अशी मात केली. गेरार्ड मोरेनो याच्या चमकदार कामगिरीमुळे व्हिलारेयालने आयबरचे आव्हान २-१ असे परतवून लावले. मोरेनोने एक गोल करत दुसऱ्या गोलमध्ये सहाय्यकाची भूमिका बजावली. गेटाफे ने ओसासुनाचा १-० असा पराभव के ला. ५४व्या मिनिटाला जायमे माटा याने केलेला गोल निर्णायक ठरला.

फ्रेंच लीग-१ फु टबॉल : एड्रियन ट्रफे र्टचे स्वप्नवत पदार्पण

’  युवा खेळाडू एड्रियन ट्रफे र्ट याने मिळालेल्या संधीचे सोने करत फ्रे ंच लीग-१ फु टबॉलमध्ये स्वप्नवत पदार्पण केले. पहिल्या सत्रात फे टोउट मौसा जायबंदी झाल्यानंतर १८ वर्षीय ट्रफे र्ट याला संधी मिळाली. त्यानंतर त्याने गोलसहाय्यकाची जबाबदारी निभावताना भरपाई वेळेत गोल लगावत रेन्नेसला मोनॅकोवर २-१ असा विजय मिळवून दिला.