फ्रेंच खुली स्पर्धा आणि क्ले कोर्ट हंगाम सप्टेंबरमध्ये होऊ शके ल, असा विश्वास व्यावसायिक टेनिस संघटनेचे (एटीपी) प्रमुख आंद्रेआ गॉडेन्झी यांनी व्यक्त केला.
‘‘ऑगस्टमध्ये जर टेनिसचा हंगाम सुरू झाला तर उर्वरित कालावधीत तीन ग्रँडस्लॅम पूर्ण करता येतील. सहा मास्टर्स स्पर्धाही खेळवणे अपेक्षित आहे. ऑगस्टमधील अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेनंतर क्ले कोर्टवर चार आठवडय़ांचे टेनिस होऊ शके ल. या स्थितीत सप्टेंबरमधील फ्रेंच खुल्या स्पर्धेआधी माद्रिद आणि रोम या क्ले कोर्टवरील स्पर्धा होऊ शकतात,’’ असे गॉडेन्झी यांनी म्हटले. गेल्या महिन्याच्या सुरुवातीपासून करोनामुळे जागतिक टेनिसदेखील ठप्प आहे. जूनमध्ये होणारी विम्बल्डन खुली स्पर्धादेखील दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर प्रथमच रद्द करण्यात आली आहे. मे महिन्यात होणारी फ्रेंच खुली स्पर्धादेखील सप्टेंबरमध्ये खेळवण्यात येणार आहे.