07 April 2020

News Flash

हिलरॉड चषक बुद्धिबळ स्पर्धा : गुकेशला विजेतेपद

गुकेशला या स्पर्धेत दुसरे मानांकन देण्यात आले होते. ‘‘

चेन्नई : ग्रॅँडमास्टर डी. गुकेश याने डेन्मार्क येथील ११०व्या हिलरॉड चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत ९ पैकी ८ गुण मिळवत गुकेशने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. त्यात सात विजयांचा समावेश आहे. गुकेशने दोन लढती बरोबरीत सोडवल्या. १३ वर्षीय गुकेश गेल्या वर्षी जानेवारीमध्ये जगातील दुसरा सर्वात युवा ग्रँडमास्टर ठरला होता.

गुकेशला या स्पर्धेत दुसरे मानांकन देण्यात आले होते. ‘‘मी याआधी विविध वयोगटांतील स्पर्धा जिंकल्या आहेत. मात्र खुल्या स्पर्धेतील हे विजेतेपद माझ्यासाठी विशेष आहे. या स्पर्धेत सुरुवातीपासून माझी कामगिरी चांगली झाली आणि मी स्पर्धेत एकही लढत गमावली नाही. या स्पर्धेतील चांगल्या कामगिरीची पुनरावृत्ती फ्रान्समधील कान्स बुद्धिबळ स्पर्धेतही करण्याचा माझा प्रयत्न आहे,’’ असे गुकेशने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2020 1:01 am

Web Title: grandmaster d gukesh won hillerod open in denmark zws 70
Next Stories
1 आशियाई कुस्ती स्पर्धा : आशू, आदित्य, हरदीपला कांस्यपदक
2 पाकिस्तानचं एक पाऊल मागे, आशिया चषकाचं यजमानपद सोडण्याचे दिले संकेत
3 Video : जगातलं सर्वात मोठं मैदान आतमधून कसं दिसतं पाहिलंत का??
Just Now!
X