पुरुष हॉकी संघात स्थान, महिला संघाचे नेतृत्व रितू राणीकडे
गैरवर्तणूक आणि संघात दुफळी निर्माण करण्याच्या कारणावरून निलंबनाच्या कारवाईला सामोरे गेलेल्या गुरबाज सिंग याचे भारताच्या पुरुष हॉकी संघात पुनरागमन झाले. ५ ते १६ फेब्रुवारी गुवाहाटी येथे होणाऱ्या दक्षिण आशियाई स्पध्रेसाठीच्या पुरुष व महिला हॉकी संघाची घोषणा सोमवारी करण्यात आली. मनदीप अंटीलकडे पुरुष संघाचे, तर रितू राणीकडे महिला संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
दक्षिण आशियाई स्पध्रेत भारतीय महिलांसमोर श्रीलंका, नेपाळचे आव्हान असेल, तर पुरुष संघ बांगलादेश, श्रीलंका आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. ७ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत येथील भेतापरामधील मौलाना एमडी. तयाबुल्लाह स्टेडियमवर हॉकीचे सामने खेळविण्यात येणार आहेत. भारतीय पुरुष संघाने प्रशिक्षक बी. जे. करिअप्पा म्हणाले की,‘‘ या स्पध्रेत ते चांगली कामगिरी करतील. गतउपविजेतेपदाचे रुपांतर यंदा जेतेपदात करण्यात यश मिळेल अशी आशा आहे.’’
पुरुष संघ : गोलरक्षक : विकास दाहिया, पंकज रजक; बचावपटू : नीलम संजीप क्सेस, चियन्ना ए.बी., सुखमंजित सिंग, गगनप्रीत सिंग, अजितेश रॉय (उपकर्णधार), गुरबाज सिंग; मध्यरक्षक : अजय यादव, मनप्रीत सिंग, विकास चौधरी, प्रधान सोम्मन्ना पी.; आघाडीपटू : मोह. उमर, अनुप वाल्मीकी, मनदीप अंटील (कर्णधार), पी. एल. थिम्मण्णा, गगनदीप सिंग, अजित कुमार पांडे.

महिला संघ : गोलरक्षक : योगिता बाली, सोनल मिंझ; बचावपटू : जस्प्रीत कौर, रेणुका यादव, गुरजित कौर, हनिअलूम लाल रौत फेली, सुशिला चानू पुख्रम्बम, पोन्नम्मा मल्लमदा नरेंद्र; मध्यरक्षक : रितू राणी (कर्णधार), श्यामा तिरगम, प्रीती दुबे, सोनिका, दीपिका (उपकर्णधार); आघाडीपटू : राणी, ज्योती गुप्ता, नेहा गोयल, पुनम बार्ला, सौंदर्या येंडाला.