करोना विषाणूचा फटका जगभरातील क्रीडा विश्वाला बसला आहे. बीसीसीायने आपल्या सर्व महत्वाच्या स्पर्धांसोबत आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजनही पुढे ढकललं आहे. वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मात्र करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आयपीएलने सहा महिने संपूर्ण देश लॉकडाउन केला आहे. यामुळे टी-२० विश्वचषकाच्या आयोजनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सध्याच्या लॉकडाउन काळात अनेक भारतीय खेळाडू सोशल मीडियावर संवाद साधत क्रिकेटचा माहोल कायम ठेवत आहेत.

कसोटी संघाचा जलदगती गोलंदाज उमेश यादवने नुकताच Sportskeeda संकेतस्थळाशी संवाद साधला. यावेळी उमेशने आगामी टी-२० विश्वचषकासाठी आपली टी-२० टीम जाहीर केली. यावेळी त्याने आपण टी-२० विश्वचषकासाठीच्या शर्यतीत नसल्याचं म्हटलंय. “फिरकीपटू म्हणून कुलदीप आणि चहलची संघात निवड होईल. बुमराह आणि भुवनेश्वर हे दोन जलदगती गोलंदाज म्हणून संघात स्थान मिळवतील. तिसऱ्या गोलंदाजासाठी दिपक चहर आणि शमीमध्ये स्पर्धा असेल. मी या शर्यतीमध्ये नाहीये.” उमेश यादवने Sportskeeda शी बोलताना स्पष्ट केलं.

असा आहे उमेश यादवने निवडलेला टी-२० संघ –

रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, महेंद्रसिंह धोनी (धोनी खेळणार नसेल तर ऋषभ पंत), कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार , दिपक चहर/मोहम्मद शमी