आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या क्रमवारीत घसरण झालेली आहे. बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका १-१ अशा बरोबरीत सोडवल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या क्रमवारीत ही घसरण झाल्याचं कळतंय. आयसीसीने नुकतीच कसोटी क्रिकेटमधली संघांसाठी क्रमवारी जाहीर केली. मात्र श्रीलंकेविरुद्ध ३-० असा विजय मिळवल्याने भारताने कसोटी क्रमवारीतलं आपलं पहिलं स्थान अबाधित राखलेलं आहे.

सध्या १२५ गुणांसह भारत पहिल्या क्रमांकवर असून, ऑस्ट्रेलिया ९७ गुणांसह पाचव्या स्थानावर घसरलेला आहे. बांगलादेशविरुद्धची मालिका सुरु होण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या खात्यात १०० गुण जमा होते. मात्र मालिका बरोबरीत सुटल्यामुळे ऑस्ट्रेलियाला ३ गुणांचा तोटा सहन करावा लागला आहे.

अवश्य वाचा – पीटर हँडस्काँबचं वर्कआऊट, अडीच तासात साडेचार किलो वजन घटवलं

क्रमवारीत आपलं स्थान सुधारण्यासाठी ऑस्ट्रेलियाला बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका १-० ने जिंकण गरजेचं होतं. मात्र पहिल्याच कसोटीत ऑस्ट्रेलियाला बांगलादेशकडून हार पत्करावी लागली. मात्र अखेरच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. बांगलादेशला मात्र या कसोटी मालिकेतून चांगलाच फायदा झालेला आहे. पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर मिळवलेला विजय, आणि दुसऱ्या कसोटीतला आक्रमक खेळ या जोरावर बांगलादेशच्या खात्यात ५ गुण जमा झाले आहेत. मात्र ७४ गुणांसह बांगलादेश अजुनही जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर कायम आहे.

आयसीसीची कसोटी संघांसाठी क्रमवारी –

१) भारत – १२५ गुण

२) दक्षिण आफ्रिका – ११० गुण

३) इंग्लंड – १०५ गुण

४) न्यूझीलंड – ९७ गुण

५) ऑस्ट्रेलिया – ९७ गुण

६) पाकिस्तान – ९३ गुण

७) श्रीलंका – ९० गुण

८) वेस्ट इंडिज – ७५ गुण

९) बांगलादेश – ७४ गुण

१०) झिम्बाब्वे – ० गुण