आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यातील फॉलो-ऑन नियमाबाबत माहिती दिली आहे. सामन्याचा पहिला दिवस वाया गेला, तरी फॉलो-ऑनचा नियम बदलणार नसल्याचे आयसीसीने सांगितले. हवामान आणि पावसाचा विचार करता या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. साऊथम्प्टन येथे १८ जूनपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात हा सामना रंगणार आहे.

आयसीसीच्या फॉलो-ऑन कलम १४.१.१नुसार, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला आपल्या धावसंख्येत २०० धावांची आघाडी मिळाल्यास, प्रतिस्पर्धी संघाला पुन्हा फलंदाजीसाठी बोलले जाऊ शकते. ३ ते ४ अशा कमी दिवसांच्या सामन्यासाठी ही आघाडी १५० धावांची असते. २ दिवसांच्या सामन्यात १०० धावांची आघाडी आणि एका दिवसाच्या सामन्यात ७५ धावांची आघाडी फॉलो-ऑनसाठी वैध आहे.

हेही वाचा – खलिस्तानी दहशतवाद्याला ‘शहीद’ म्हणणं हरभजनला पडलं महागात, लोकांनी केलं जबरदस्त ट्रोल

सामन्याच्या पहिल्या आणि दुसर्‍या दिवशी कोणताही खेळ न झाल्यास, कलम १४.१ खेळाच्या प्रारंभापासून उर्वरित दिवसांच्या संख्येनुसार (राखीव दिवसासह) लागू होईल. सामना सुरू होणारा दिवस संपूर्ण दिवस म्हणून गणला जाईल, मग तो कोणत्याही वेळेस सामना झाला तरी चालेल. पहिले षटक सुरू होताच खेळाचा दिवस मोजला जाईल.

आयसीसीने म्हटले आहे, की जर पहिल्या आणि दुसर्‍या दिवसाचा खेळ झाला नाही, तर फॉलो-ऑनसाठी आवश्यक असलेली आघाडी १५० धावा अशी होईल.

हेही वाचा – काय सांगता..! महेंद्रसिंह धोनीने स्कॉटलंडहून मागवला महागडा घोडा

दोन्ही संघ –

भारत – रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे , हनुमा विहारी, ऋषभ पंत, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल, वृद्धिमान साहा.

राखीव खेळाडू : अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्जन नगवासवाला

न्यूझीलंड – केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, डेव्हन कॉनवे, कॉलिन डी ग्रँडहोम, जैकब डफी, मॅट हेनरी, काइल जेमीसन, टॉम लाथम, डेरिल मिशेल, हेनरी निकोलस, एजाज पटेल, रचिन रविंद्र, मिशेल सेंटनेर, टिम साउथी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वाटलिंग (यष्टीरक्षक), विल यंग.