युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराहने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने आपल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला २२७ धावांवर रोखण्यात यश मिळवलं. युजवेंद्र चहलने ४ बळी घेत आफ्रिकेच्या डावाला खिंडार पाडलं. आफ्रिकेच्या संघात ख्रिस मॉरिस, फेलुक्वायो आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस यांचा अपवाद वगळता एकही फलंदाज भारताच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. २२८ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही.

अवश्य वाचा – आम्ही सारखी सारखी दया दाखवत नाही, क्विंटन डी-कॉक बाद झाल्यानंतर सेहवागचं खोचक ट्विट

कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर फटका खेळण्याच्या प्रयत्नात शिखर धवनच्या बॅटचा तुकडाच पडला. सामन्याच्या दुसऱ्या षटकात हा प्रकार घडला. या मजेशीर प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

या प्रसंगानंतरही शिखर धवन खेळपट्टीवर फारसा तग धरु शकला नाही. कगिसो रबाडानेच त्याला यष्टीरक्षक क्विंटन डी-कॉक करवी माघारी धाडलं.

अवश्य वाचा – Video : जेव्हा चहल आफ्रिकेच्या फलंदाजाला मामा बनवतो