News Flash

पुढच्या ५० डावात सरफराज ५०० धावा करेल, सोशल मीडियावर ट्रोल

५०० धावा करण्याचा आत्मविश्वास व्यक्त करणारा पाकचा कर्णधार सरफराज अहमदला सोशल मीडियावर मोठया प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.

पाकिस्तानचे २०१९ विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. पाकिस्तानला वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यामुळे ५०० धावा करण्याचा आत्मविश्वास व्यक्त करणारा त्यांचा कर्णधार सरफराज अहमदला सोशल मीडियावर मोठया प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. लिजिंड ५०० धावांपासून फक्त ४९८ धावांनी मागे राहिला. पुढच्या ५० डावात तो ५०० धावा करेल असे एका टि्वटर युझरने म्हटले आहे.

पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानने ३१५ धावांपर्यंत मजल मारत बांगलादेशला ३१६ धावांचं आव्हान दिलं. मात्र उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानला बांगलादेशला ७ धावांच्या आत सर्वबाद करायचं होतं. हे अशक्यप्राय आव्हान पाकिस्तानी गोलंदाज पूर्ण करु शकले नाहीत.

या सामान्याच्या आधी पाकिस्तानी कर्णधार सरफराज अहमदने ५०० धावा करू आणि बांगलादेशला फक्त ५० वर बाद करु असे विधान केले होते. सरफराजने स्वत: या सामन्यात नाबाद तीन धावा केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 8:53 pm

Web Title: icc world cup 2019 pakistan vs bangladesh sarfaraz ahmed social media troll dmp 82
Next Stories
1 World Cup 2019 : पाकिस्तानची बांगलादेशवर मात, मात्र स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात
2 …तर मी इंग्लंडच्या रस्त्यांवर शर्ट काढून फिरेन: विराट कोहली
3 World Cup 2019 : धोनीने एक-दोन वर्ष क्रिकेट खेळत रहावं – लसिथ मलिंगा
Just Now!
X