सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (SCG) होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा तिसरा कसोटी सामना केवळ २५ टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळवला जाणार असल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निश्चित केलं आहे. येत्या ७ जानेवारी रोजी हा सामना होणार आहे.

सिडनीमध्ये करोनाच्या संसर्गाचा उद्रेक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सिडनीच्या प्रशासनाने ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडे एससीजी मैदानाची क्षमता ५० टक्क्यांहून २५ टक्के घटवण्याची मागणी केली आहे. न्यू साऊथ वेल्सच्या सरकारच्या सल्ल्याने ही मागणी करण्यात आली.

आणखी वाचा- ‘नियमांतर्गत खेळा नाहीतर इथे येऊ नका’, क्विन्सलँडच्या सरकारने भारतीय टीमला सुनावलं

दरम्यान, तिसरा कसोटी सामना सिडनीहून मेलबर्नला हालवण्याचा विचार क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सुरु होता. मात्र, अंतिमतः सिडनी क्रिकेट ग्राउंडवरच हा सामना खेवळण्याचे निश्चित करण्यात आले.

आणखी वाचा- कठीण समय येता, बुमराह कामास येतो – सचिन तेंडुलकर

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे हंगामी सीईओ निक हॉक्ली म्हणाले, “करोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टंसिंगचे व्यवस्थित पालन केले जावे यासाठी एससीजीची क्षमता घटवणे गरजेचे होते. त्यामुळे तिकीट विकत घेतलेल्या प्रेक्षकांनी संयम दाखवल्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो. या प्रेक्षकांचे पैसे आम्ही आज परत करणार आहोत. त्यानंतर सीएसजीची बैठक व्यवस्था निश्चित करुन पुन्हा तिकीट विक्री केली जाईल.”