27 September 2020

News Flash

IND vs AUS : टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार कोहलीची अनोख्या विक्रमाशी बरोबरी

तिलकरत्ने दिलशानच्या विक्रमाशी बरोबरी

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दुसऱ्या टी-20 सामन्यात महेंद्रसिंह धोनीसोबत आक्रमक फलंदाजी करत संघाला 190 धावांचा टप्पा गाठून दिला. कोहलीने 38 चेंडूत 72 धावा पटकावल्या. या खेळीत 6 षटकार आणि 2 चौकार लगावले. या खेळीदरम्यान कोहलीने दोन विक्रम आपल्या नावे जमा केले आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारणाऱ्या विक्रमाशी कोहलीने बरोबरी साधली आहे. श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशान याच्या नावे आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 223 चौकार जमा आहेत. कोहलीनेही आज आपला 223 वा चौकार लगावला.

याचसोबत धोनीने टी-20 क्रिकेटमधलं आपलं षटकारांचं अर्धशतकही पूर्ण केलं. कोहलीने आजच्या सामन्यात 6 षटकार लगावले, सध्या त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 54 षटकार जमा आहेत. या सामन्यात विराटने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं.

अवश्य वाचा – IND vs AUS : जोडी तुझी-माझी ! कोहली-धोनीचं टी-20 क्रिकेटमध्ये षटकारांचं अर्धशतक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2019 9:30 pm

Web Title: ind vs aus virat kohli equals world record for hitting most fours in t20is
Next Stories
1 IND vs AUS : जोडी तुझी-माझी ! कोहली-धोनीचं टी-20 क्रिकेटमध्ये षटकारांचं अर्धशतक
2 साहाचे टी २० मध्ये धमाकेदार शतक; लगावले १६ चौकार
3 इंग्लंडच्या निवृत्त कर्णधाराने १२ वर्षानंतर केला मैदानाबाहेर विक्रम
Just Now!
X