News Flash

Video : विराट कोहली की जॉन्टी ऱ्होड्स?? तुम्हीच ठरवा…

हेन्री निकोलसला धाडलं माघारी

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय संघाने श्रेयस अय्यरचं शतक आणि विराट-लोकेश राहुलच्या अर्धशतकांच्या जोरावर ३४७ धावांचा डोंगर उभा केला. भारताच्या या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडनेही चांगली सुरुवात केली. मार्टीन गप्टील आणि हेन्री निकोसल यांनी पहिल्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी केली. हेन्री निकोसलने यादरम्यान आपलं अर्धशतकही पूर्ण केलं.

मार्टीन गप्टील माघारी परतल्यानंतर, टॉम ब्लंडलही स्वस्तात माघारी परतला. यानंतर निकोलस आणि रॉस टेलर यांच्यात ६२ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. निकोलसने खेळपट्टीवर जम बसवल्यामुळे भारताला ही जोडी डोकेदुखी ठरणार अशी चिन्ह दिसत होती. मात्र जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर एक धाव घेताना निर्माण झालेल्या गोंधळावर निकोसल धावबाद झाला. विराट कोहलीनेही संधीचा फायदा उचलत हवेत उडी घेत निकोलसला माघारी धाडलं. विराटच्या या अफलातून रन-आऊटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

८२ चेंडूंमध्ये हेन्री निकोलसने ११ चौकारांसह ७८ धावांची खेळी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2020 2:31 pm

Web Title: ind vs nz 1st odi watch how virat kohli gets out henry nicholas video goes viral psd 91
टॅग : Ind Vs Nz,Virat Kohli
Next Stories
1 Ind vs NZ : विराट कोहलीने मोडला ‘दादा’ माणसाचा विक्रम
2 लोकेश राहुल भारताचा Swiss Knife; मोहम्मद कैफ राहुलच्या खेळीवर फिदा
3 तब्बल ३२ वर्षांनी न्यूझीलंडच्या भूमीवर श्रेयस अय्यरने घडवला इतिहास
Just Now!
X