News Flash

Ind vs NZ : सलग दुसऱ्या सामन्यात लोकेश राहुलचा डंका, अनोख्या विक्रमाची नोंद

दुसऱ्या सामन्यात राहुलचं नाबाद अर्धशतक

टीम इंडियाचा सलामीवीर लोकेश राहुल सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. न्यूझीलंड दौऱ्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात राहुलने नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. लोकेश राहुलने ५० चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ५७ धावा केल्या. या अर्धशतकी खेळाच्या जोरावर राहुलने अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे.

अवश्य वाचा – Ind vs NZ : विराटसेनेने गाजवलं ऑकलंडचं मैदान, अनोखी कामगिरी करणारा पहिला आशियाई संघ

न्यूझीलंडमध्ये आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकं झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत राहुल आता पहिल्या स्थानी आहे.

याचसोबत आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सलग ३ अर्धशतकं झळकावणाऱ्यांच्या यादीतही राहुलने आपलं स्थान पक्क केलंय.

दरम्यान, भारतीय डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या ८ धावा काढून माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुलने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र टीम साऊदीच्या गोलंदाजीवर विराट यष्टीरक्षक सेफर्टकडे झेल देऊन माघारी परतला. यानंतर लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी संघाचा डाव सावरत महत्वपूर्ण भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी केली. श्रेयस अय्यर विजयासाठी अवघ्या काही धावा हव्या असताना इश सोधीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर लोकेश राहुल आणि शिवम दुबेने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

अवश्य वाचा – Ind vs NZ : राहुलच्या आक्रमणासमोर किवींची शरणागती, भारताची मालिकेत २-० ने आघाडी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2020 4:36 pm

Web Title: ind vs nz 2nd t20i lokesh rahul shines with his not out half century creates multipal record psd 91
टॅग : Ind Vs Nz
Next Stories
1 Ind vs NZ : विराटसेनेने गाजवलं ऑकलंडचं मैदान, अनोखी कामगिरी करणारा पहिला आशियाई संघ
2 Ind vs NZ : विराट कोहलीचा रोहित शर्माला धोबीपछाड
3 Ind vs NZ : असं काय घडलं की विराटवर आली तोंड लपवण्याची वेळ…
Just Now!
X