29 November 2020

News Flash

Ind vs WI : हिटमॅन रोहितची ख्रिस गेलशी बरोबरी

दुसऱ्या टी-२० सामन्यात रोहितचं अर्धशतक

पहिल्या टी-२० सामन्यात विंडीजवर ४ गडी राखून भारताने मात केली. मात्र ९६ धावांचं आव्हान पार करताना भारतीय फलंदाजांना शर्थीचे प्रयत्न करावे होते. मात्र दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. रोहित शर्मा आणि शिखर धवन जोडीने पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत भारताला भक्कम सुरुवात करुन दिली.

रोहित शर्माने पहिल्याच षटकात चौकार ठोकत भारतीय डावाची सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटच्या इतिहासात पहिल्याच चेंडूवर सर्वाधिक वेळा चौकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहितने ख्रिस गेलशी बरोबरी केली आहे. गेल आणि रोहित या दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत ४-४ वेळा अशी कामगिरी केली आहे. न्यूझीलंडचा मार्टीन गप्टील या यादीमध्ये पहिल्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत सहावेळा अशी कामगिरी करुन दाखवली आहे.

दरम्यान विंडीजच्या गोलंदाजांचा समाचार घेत रोहितने दुसऱ्या सामन्यात अर्धशतकही झळकावलं आहे. ६७ धावांची खेळी करुन तो माघारी परतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2019 9:09 pm

Web Title: ind vs wi rohit sharma equals with unique record of chris gayle psd 91
Next Stories
1 Ind vs WI 2nd T20I : डकवर्थ नियमानुसार भारताची सामन्यात बाजी, मालिकाही खिशात
2 “पृथ्वी शॉ ला इतक्या कठोर शिक्षेची गरज नव्हती”
3 Thailand Open Badminton : सात्विकराज-चिराग शेट्टी जोडीला दुहेरीचं विजेतेपद
Just Now!
X