News Flash

वन-डे क्रमवारीत भारताच्या अव्वल स्थानावर आयसीसीची मोहर

ICC कडून अधिकृत घोषणा

विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध सामना सुरु झाल्यानंतर भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या स्थानावर पोहचला आहे. बुधवारी ESPNCricinfo या संकेतस्थळाने भारत वन-डे क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहचल्याची बातमी दिली होती. आयसीसीने आज यावर आपली मोहर उमटवली आहे.

इंग्लंडचा संघ वन-डे क्रमवारीमध्ये अव्वल होता. मात्र विश्वचषक स्पर्धेत सलग ३ सामने गमावल्याचा इंग्लंडला फटका बसला आहे. या तुलनेत भारतीय संघाने आश्वासक कामगिरी करत ४ विजय मिळवले आहेत. त्यामुळे १२३ गुणांसह भारत सध्या क्रमवारीत पहिलं स्थान मिळवलं आहे. इंग्लंडच्या खात्यात सध्या १२२ गुण जमा आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 3:54 pm

Web Title: india have displaced england as the no 1 ranked side on the icc odi ranking psd 91
टॅग : Bcci,Icc
Next Stories
1 डेव्हिस चषकासाठी भारतीय टेनिस संघ पाकिस्तानला जाणार?
2 World Cup 2019 IND vs WI : भारत अजिंक्यच! कॅरेबियन वादळ मात्र शमलं…
3 World Cup 2019 : एका शतकी खेळीमुळे बाबर आझमचं नाव दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत
Just Now!
X