दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज कगिसो रबाडाला सामन्यात आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकरणी आयसीसीच्या शिक्षेला सामोरं जावं लागणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह वर्तन आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी कगिसो रबाडावर श्रीलंकेविरुद्ध वन-डे सामन्यात आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात कारवाई करण्यात आली होती. इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटीत रबाडाच्या वर्तनावरुन आयसीसीसीने त्याच्यावर एका कसोटी सामन्याची बंदी घातली होती. यानंतर रबाडाकडून पुन्हा एकदा आक्षेपार्ह वर्तन घडल्यास दोन कसोटी – टी-२० सामने किंवा ४ वन-डे सामन्यांची शिक्षा घातली जाऊ शकते.

अवश्य वाचा – वन-डे मालिकेत भारताचा विजय, आयसीसी क्रमवारीतही पटकावलं पहिलं स्थान

भारताविरुद्ध पाचव्या वन-डे सामन्यात आठव्या षटकात रबाडाने शिखर धवनला माघारी धाडलं. यावेळी शिखर पॅव्हेलियनकडे परतत असताना रबाडाने शिखरकडे पाहून आक्षेपार्ह शब्द वापरले. ही बाब मैदानातील पंच इयन गुल्ड आणि शॉन जॉर्ज यांच्या नजरेतून सुटली नाही. यानंतर तिसरे पंच अलीम दार आणि सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी चर्चा करुन रबाडाला शिक्षा सुनावल्याचं समजतंय. सामना संपल्यानंतर सामनाधिकाऱ्यांसमोर झालेल्या सुनावणीतही रबाडाने आपली चुक मान्य केली.

अवश्य वाचा – विराट विक्रम – द.अफ्रिकेमधला भारताचा 25 वर्षांतला पहिला मालिका विजय