ऑस्ट्रेलिया विरूद्ध घरच्या मैदानावर २-१ अशी क्रिकेट मालिका जिंकल्यानंतर आता भारतापुढे न्यूझीलंडचे आव्हान आहे. न्यूझीलंडच्या भूमीवर ही मालिका खेळण्यात येणार आहे. भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर २४ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान ५ टी २० सामने खेळणार आहे. टी २० मालिका झाल्यावर ५ ते ११ फ्रेब्रुवारी दरम्यान ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. तर दौऱ्याच्या अखेरीस २१ फेब्रुवारी ते ४ मार्च या दरम्यान २ कसोटी सामने खेळणार आहेत. या दौऱ्यात साऱ्यांचे लक्ष हे टीम इंडियाच्या खेळाडूंकडे असणार आहे. त्यातच कर्णधार विराट कोहली हा वेगवान गोलंदाजांचा सामना कसा करतो, ते बघू असे मत न्यूझीलंडचे प्रशिक्षक माईक हेसन यांनी व्यक्त केले आहे.

IND vs NZ : धवनच्या जागी मुंबईकर खेळाडूला संधी; पाहा T20…

कोहली बद्दल काय म्हणाले हेसन?

“भारत-न्यूझीलंड संघांमध्ये अटीतटीचे सामने होतील अशी माझी अपेक्षा आहे. विराट कोहली या दौऱ्यात सुरूवातीच्या १०-२० चेंडूत वेगवान गोलंदाजांचा कशाप्रकारे सामना करतो हे पाहण्यात मला रस आहे. जर विराटला चांगली सुरूवात मिळाली, तर तो धमाकेदार कामगिरी करू शकतो. न्यूझीलंडच्या संघाची गेल्या काही दिवसांतील आकडेवारी पाहिली तर त्यांना घरच्या मैदानावर पराभूत करणं खूप कठीण आहे. पण भारताकडे वेगवान गोलंदाजांचा प्रतिभावंत ताफा आहे. त्यामुळे हा दौरा खूपच रोमांचक होईल”, असा विश्वास माईक हेसन यांनी व्यक्त केला.

माईक हेसन

खिलाडूवृत्ती! U-19 टीम इंडियाने पराभूत संघासोबत काढला फोटो

कोणती द्वंद्व असतील रोमांचक

“ट्रेंट बोल्ट विरूद्ध रोहित शर्मा यांच्यातील द्वंद्व पाहणं महत्त्वाचं ठरेल. विशेषत: स्विंग गोलंदाजीचा रोहित कसा सामना करेल हे पाहणं औत्सुक्याचे असेल. त्याशिवाय न्यूझीलंडची फलंदाजांची मधली फळी विरूद्ध भारताचे कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल हे मनगटी फिरकीपटू हे द्वंद्वदेखील रोमांचक होईल”, असे हेसन यांनी नमूद केले.

धवनला ‘गब्बर’ धक्का, IPL 2020 मध्ये खेळण्याबाबत साशंकता

धवनच्या जागी टी २० संघात संजू सॅमसन

श्रीलंकेविरूद्धच्या टी २० मालिकेत एका सामन्यात संजू सॅमसनला संधी देण्यात आली होती. त्या सामन्यात त्याने पहिला चेंडू षटकार लगावला तर दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. त्यानंतर न्यूझीलंड मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला. त्या संघात संजू सॅमसनला संधी दिली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण त्याला संघातून वगळल्यामुळे नेटकऱ्यांनी BCCI वर टीकेची झोड उठवली होती. अखेर धवनच्या दुखापतीमुळे त्याला संघात स्थान मिळाले आहे.

टीम इंडिया न्यूझीलंडमध्ये दाखल, विराट-रोहितने शेअर केले फोटो

एकदिवसीय संघात पृथ्वी शॉ ला संधी

भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर ५ ते ११ फ्रेब्रुवारी दरम्यान ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. या दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर करण्यात आलेल्या संघात दुखापतग्रस्त शिखर धवनच्या जागी युवा मुंबईकर पृथ्वी शॉ ला संधी देण्यात आली आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या भारत अ संघाने पहिल्याच सामन्यात शानदार विजेतेपद मिळवले होते. दुखापतीमधून सावरत संघात पुनरागमन केलेल्या पृथ्वी शॉने दमदार शतक ठोकले होते. पृथ्वीने १०० चेंडूत २२ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने पृथ्वी शॉने १५० धावा केल्या होत्या.