28 February 2021

News Flash

IPL Retention: विराट कोहली ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

तीन खेळाडूंना १५ कोटींपर्यंत किंमत मिळाली

कसोटी, एकदिवसीय सामने आणि टी-२० अशा सर्वच प्रकारच्या क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणारा विराट कोहली आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कालच जाहीर झालेल्या कायम ठेवण्यात आलेल्या खेळाडूंच्या (रिटेन्शन) यादीमध्ये विराटला बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सने १७ कोटींची किंमत मोजून आपल्या संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी पुणे सुपरजायंट्सने इंग्लंडच्या बेन स्ट्रोक्सला संघात घेण्यासाठी १४ कोटी ५० लाख मोजले होते. हा विक्रमही विराटने मोडीत काढला आहे.

मागील वर्षापेक्षा यंदा संघांनी बड्या खेळाडूंना आपल्या संघात ठेवण्यासाठी हात सैल सोडल्याचे दिसत आहे. त्यामुळे मागील वर्षी १४ कोटी ५० लाखांची सर्वोच्च बोली असताना यंदा मात्र तीन खेळाडूंना १५ कोटींपर्यंत किंमत मिळाली आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही खेळाडू भारतीय आहेत. विराट खालोखाल चेन्नई सुपरकिंग्सने महेंद्र सिंग धोनीला तर मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला प्रत्येकी १५ कोटींची किंमत मोजत संघात कायम ठेवले आहे.

तीन भारतीय खेळाडूंना १५ कोटींपर्यंत किंमत मिळाली

 

रिटेन्शनमध्ये कोणता संघ कोणाला आपल्या संघात ठेवतो याबद्दल मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंच्या यादीमध्ये अनेक नावे अपेक्षेप्रमाणे असली तरी काही अनपेक्षित नावेही या यादीमध्ये दिसत आहेत. यामध्ये प्रामुख्याने सांगायचे झाले तर ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार स्टीव स्मिथ या एकमेव खेळाडूला राजस्थान रॉयल्सने कायम ठेवले आहे. स्मिथसाठी राजस्थानने १२ कोटींची किंमत मोजली आहे. तर ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा उप-कर्णधार डेव्हिड वॉर्नर (१२ कोटी) आणि भारतीय जलद गोलंदाजीची धुरा ज्याच्याकडे आहे त्या भुवनेश्वर कुमारला (८ कोटी ५० लाख) सनरायझर्स हैदराबादने कायम ठेवले आहे.

आयपीएलच्या ११व्या सीजनसाठी संघाने कायम न ठेवलेल्या खेळांडूंमध्ये गौतम गंभीरचे नाव प्रामुख्याने घेतले जात आहे. अभिनेता शाहरुख खानची भागीदारी असणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने गंभीरऐवजी वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज सुनिल नरेन (८ कोटी ५० लाख) आणि आंद्रे रसेलला (७ कोटी) कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

किंग्स इलेवन पंजाबनेही राजस्थानप्रमाणे एकाच खेळाडूला आपल्या संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षर पटेलला पंजाबने ६ कोटी ७५ लाखांना विकत घेतले आहे. तर दिल्ली डेयरडेविल्सने क्रिस मॉरिस (७ कोटी १० लाख), ऋषभ पंत (८ कोटी), श्रेयस अय्यर (७ कोटी) या तीन खेळाडूंना कायम ठेवले आहे. दिल्ली प्रमाणेच मुंबई इंडियन्स आणि रॉयल चैलेंजर्स बेंगलुरूनेही तीन तीन खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईने रोहित शर्माबरोबरच जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह (७ कोटी) आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला (११ कोटी) कायम ठेवले आहे. तर बेंगळूरुने कोहली व्यतिरिक्त ए. बी. डिविलियर्स आणि सरफराज खानला आपल्या संघात कायम ठेवले आहे. या दोघांसाठी अनुक्रमे ११ कोटी आणि १ कोटी ७५ लाख किंमत बेंगळूरुने मोजली आहे.

आठही संघांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी:

१. रॉयल चैलेंजर्स बेंगळूरू : विराट कोहली, ए. बी. डिविलियर्स, सरफराज खान
२. चेन्नई सुपर किंग्स : महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, रवींद्र जडेजा
३. मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या
४. दिल्ली डेयरडेविल्स : क्रिस मॉरिस, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर
५. कोलकाता नाइटराइडर्स : सुनील नरेन, आंद्रे रसेल
६. सनराइजर्स हैदराबाद : डेविड वॉर्नर, भुवनेश्वर कुमार
७. राजस्थान रॉयल्स : स्टीव स्मिथ
८. किंग्स इलेवन पंजाब : अक्षर पटेल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2018 12:33 pm

Web Title: ipl 2018 virat kohli becomes most expensive player in ipl history royal challengers bangalore retain him for rs 17 crore
Next Stories
1 परदेशातील अपयश पुसण्यासाठी भारत सज्ज
2 मल्ल की कळसूत्री बाहुल्या?
3 ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचा उरूस
Just Now!
X