News Flash

IPL 2019 : टी-20 क्रिकेटमध्ये रैनाची घौडदौड सुरुच

अनोख्या विक्रमाला गवसणी घालणारा पहिला भारतीय फलंदाज

चेन्नई सुपरकिंग्जचा फलंदाज सुरेश रैनाने रविवारी टी-20 क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. भारतीय खेळपट्टीवर टी-20 क्रिकेटमध्ये 6 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा सुरेश रैना पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. रविवारी चेपॉकच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात रैनाने ही कामगिरी केली.

चेन्नईच्या संघाकडून सुरेश रैनाचा हा 150 वा सामना होता. रैनाने 32 चेंडूत 36 धावांची खेळी केली. या खेळीत 4 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. सुरेश रैना आणि महेंद्रसिंह धोनीने केलेल्या भागीदारीमुळे खराब सुरुवात झालेला चेन्नईचा डाव सावरला. टी-20 क्रिकेटमध्ये रैनाच्या नावावर सध्या 8058 धावा जमा आहेत.

यापैकी आयपीएलमध्ये रैनाच्या नावावर 5 हजार 70 धावांची नोंद आहे. काही दिवसांपूर्वी बंगळुरुविरुद्ध झालेल्या सामन्यात सुरेश रैनाने आयपीएलमध्ये सर्वात प्रथम 5 हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा पराक्रम केला होता. उर्वरित 1605 धावा रैनाने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये भारताकडून काढल्या आहेत.

अवश्य वाचा – IPL 2019 : धोनीचं दैव बलवत्तर, बॉल स्टम्पला लागूनही Not Out

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2019 11:23 pm

Web Title: ipl 2019 csk vs rr suresh raina becomes first indian cricketer to script massive t20 record
टॅग : Csk,IPL 2019,Suresh Raina
Next Stories
1 IPL 2019 : धोनीचं दैव बलवत्तर, बॉल स्टम्पला लागूनही Not Out
2 IPL 2019 : तब्बल ३ वर्षांनी पुन्हा घडला ‘हा’ अनोखा योगायोग
3 IPL 2019 : विराटच्या बंगळुरूचा धुव्वा उडवत हैदराबादचा ‘डबल धमाका’
Just Now!
X