12 December 2019

News Flash

IPL 2020 : ८ कोटी ४० लाखांची रक्कम मोजलेल्या जयदेव उनाडकटला राजस्थानकडून डच्चू

राजस्थानने ११ खेळाडूंना केलं करारमुक्त

आयपीएलचे गेले दोन हंगाम सर्वाधिक बोली मिळवलेल्या जयदेव उनाडकटला राजस्थान रॉयल्स संघाने करारमुक्त केलं आहे. गतवर्षीच्या आयपीएल हंगामासाठी राजस्थान रॉयल्सने जयदेव उनाडकटवर तब्बल ८ कोटी ४० लाखांची बोली लावली होती. सर्वात महागडा खेळाडू ठरल्यामुळे जयदेवकडून अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र त्याला त्याच्या अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही.

त्यामुळे आगामी हंगामासाठी राजस्थानने आपल्या संघातून जयदेव उनाडकटसह अनेक महत्वाच्या खेळाडूंना करारमुक्त केलं आहे. आगामी हंगामासाठी राजस्थानने करारमुक्त केलेले खेळाडू पुढीलप्रमाणे….

 • अ‍ॅश्टन टर्नर
 • ओश्ने थॉमस
 • शुभम रांजणे
 • प्रशांत चोप्रा
 • इश सोधी
 • आर्यमान बिर्ला
 • जयदेव उनाडकट
 • राहुल त्रिपाठी
 • स्टुअर्ट बिन्नी
 • लियाम लिव्हींगस्टोन
 • सुदेशन मिथून

त्याआधी गुरुवारी राजस्थान रॉयल्सने आपला अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेला दिल्ली कॅपिटल्स संघाकडे सोपवलं होतं. त्यामुळे आगामी हंगामाच्या लिलावात राजस्थान कोणत्या खेळाडूंना संघात स्थान देतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

First Published on November 15, 2019 5:44 pm

Web Title: ipl 2020 rajasthan royals release its costly player jaidev unadkat psd 91
टॅग Ipl,Rr
Just Now!
X