News Flash

आयपीएल स्पर्धेदरम्यान रोहित शर्माच्या बुटांची चर्चा!

रोहितच्या बुटांवर खास संदेश

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएल स्पर्धेदरम्यान त्याच्या बुटांवरून देत असलेल्या संदेशामुळे चर्चेत आहे. मैदानात प्रतिस्पर्धी संघाला चीत करण्यासोबत तो जनजागृतीही करत आहे. बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात त्याने लुप्त होत असलेल्या गेंड्यांच्या प्रजाती वाचवण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानंतर कोलकाताविरुद्धच्या सामन्यातही त्याने खास संदेश दिला आहे.

चेन्नईच्या चिदम्बरम मैदानात कोलकाता विरुद्धचा सामना मुंबईने १० धावांनी जिंकला. कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात ३२ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. मात्र त्याच्या बुटावरील संदेशाने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. या सामन्यात त्याच्या बुटावर निळ्या रंगाच्या पाण्यात पोहत असलेल्या कासवाचं चित्र होतं. यातून प्लास्टिकमुक्त समुद्र हा संदेश त्याने दिला.

बंगळुरुविरुद्धच्या सामन्यातही त्याने खास संदेश दिला होता. एक शिंग असलेली गेंड्याच्या प्रजाती आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.या गेंड्याच्या प्रजाती वाचवण्यासाठी रोहित शर्माने पुढाकार घेतला आहे. बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात रोहितने घातलेल्या बुटावर एक शिंग असलेल्या गेंड्याचा फोटो होता. तसेच गेंड्यांना वाचवा असा संदेशही त्यावर लिहिण्यात आला होता. रोहित शर्माने ही माहिती आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली होती.

मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना सनराइजर्स हैदराबादसोबत आहे. हा सामना १७ एप्रिलला खेळला जाणार आहे. रोहित शर्मा या सामन्यात काय संदेश देतो याकडे क्रीडा रसिकांचं लक्ष लागून आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 4:42 pm

Web Title: ipl 2021 mi captain rohit sharma give message on shoe during match rmt 84
टॅग : IPL 2021,Rohit Sharma
Next Stories
1 IPL 2021 : राजस्थानविरुद्धच्या सामन्यापूर्वी दिल्लीच्या स्टार खेळाडूला करोनाची बाधा
2 IPL 2021: विराटसेनेचा सामना सनराइजर्स हैदराबादशी; कोण मारणार बाजी?
3 IPL2021: रोहित शर्माला फिटनेसबाबत काय वाटतं?
Just Now!
X