आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे अनेक क्रिकेटपटूंनी आपल्या चाहत्यांचा विश्वास गमावला आहे. चाहते आहेत म्हणून आम्ही क्रिकेटपटू आहोत. एखाद्या क्रिकेटपटूच्या त्याच्या चाहत्यांमुळे त्याचे स्थान उंचावते आणि त्यात अशा फिक्सिंग प्रकरणात नाव गोवले गेल्याने क्रिकेटपटू आपल्या चाहत्यांच्या विश्वास गमावून बसतात. तसेच याचा क्रिकेटच्या विश्वासार्हतेलाही मोठा फटका बसतो. असे भारतीय संघाचा माजी फलंदाज राहुल द्रविड याने म्हटले आहे.
राहुल म्हणाला, “अशा प्रकरणांमुळे क्रिकेटपटूंचे नाव वृत्तपत्राच्या शेवटच्या पानावर(क्रिडा पान) येण्याऐवजी पहिल्या पानावर येते. ही क्रिकेट विश्वासाठी अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे. जगभरात क्रिकेट खेळावर प्रेम करणारे अनेक चाहते आहेत. चाहते आहेत म्हणून क्रिकेटपटू आहेत. त्यामुळे आम्ही काय करतो? यावर चाहते, क्रिकेट, क्रिकेटमंडळ आणि शासनसुद्धा यासर्वांची विश्वासार्हता टिकून असते.”
संग्रहित लेख, दिनांक 6th Aug 2013 रोजी प्रकाशित
चाहत्यांच्या प्रेमामुळे आम्ही ‘क्रिकेटपटू’ आहोत- राहुल द्रविड
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे अनेक क्रिकेटपटूंनी आपल्या चाहत्यांचा विश्वास गमावला आहे. चाहते आहेत म्हणून आम्ही क्रिकेटपटू आहोत. एखाद्या क्रिकेटपटूच्या त्याच्या चाहत्यांमुळे त्याचे स्थान उंचावते
First published on: 06-08-2013 at 12:27 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It is because of fans that we are who we are as cricketers rahul dravid