28 September 2020

News Flash

दुसऱ्या कसोटीत आर्चरचे पदार्पण?

इंग्लंडच्या विश्वविजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावणारा जोफ्रा आर्चर कसोटी पदार्पण करणार आहे.

जोफ्रा आर्चर

लंडन : इंग्लंडच्या विश्वविजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावणारा जोफ्रा आर्चर कसोटी पदार्पण करणार आहे. लॉर्ड्सवर होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने जाहीर केलेल्या १२ खेळाडूंच्या यादीत आर्चरला स्थान देण्यात आले आहे. मात्र त्यांनी मोईन अलीला वगळले आहे. दुखापतीमुळे जेम्स अँडरसनने माघार घेतल्यामुळे दुसऱ्या कसोटीसाठी वेगवान गोलंदाज आर्चरला संधी मिळू शकेल. एजबॅस्टनला झालेला पहिला कसोटी सामना इंग्लंडने २५१ धावांनी गमावला होता. दुखापतीमुळे आर्चरला पहिल्या सामन्यात खेळता आले नव्हते. ऑफ-स्पिनर मोईन अलीच्या जागी डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लीचला इंग्लंडच्या संघात स्थान देण्यात आले आहे. वेगवान गोलंदाज ऑली स्टोनने पाठीच्या दुखापतीमुळे माघार घेतली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2019 1:42 am

Web Title: jofra archer likely to debut in the second test zws 70
Next Stories
1 प्रो कबड्डी लीग : बंगाल वॉरियर्सची यू मुंबावर मात
2 “मला मदत करा…”; द्युती चंद हिची परराष्ट्र मंत्र्यांना विनंती
3 ऐतिहासिक! आता क्रिकेट संघात दिसणार ट्रान्सजेंडर खेळाडू
Just Now!
X