२०१९ विश्वचषक स्पर्धेतून भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर, बीसीसीआयने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागवले आहेत. टीम इंडियाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विंडीज दौऱ्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे. प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत सध्या अनेक नावं चर्चेत आहेत. मात्र याबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आली नाहीये. मात्र Mumbai Mirror वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, माजी दक्षिण आफ्रिकन खेळाडू जॉन्टी ऱ्होड्स टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहेत.

या पदासाठी ऱ्होड्सने आपला अर्ज बीसीसीआयकडे दाखल केल्याचंही समजतंय. याआधी ऱ्होड्स यांनी दक्षिण आफ्रिका आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाला क्षेत्ररक्षणाचे धडे दिले आहेत. आपल्या काळात ऱ्होड्स हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले सर्वोत्तम क्षेत्ररक्षक मानले जायचे. आर.श्रीधर हे टीम इंडियाचे सध्याचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहेत. ३० जुलैपर्यंत बीसीसीायने भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहेत.

अवश्य वाचा – Video : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी अजिंक्य रहाणे तयार, जिममध्ये करतोय कसून मेहनत