कबड्डीपटू सिद्धार्थ देसाई आशावादी

मुंबई : मागील हंगामात बऱ्याचशा कबड्डीपटूंनी एक कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे माझ्या कामगिरीच्या बळावर प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाच्या लिलावामध्ये मला एक कोटी रुपयांची बोली नक्की लागेल, असा विश्वास कबड्डीपटू सिद्धार्थ देसाईने व्यक्त केला.

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Ramzan 2024
रमजान: जगातील विविध धर्मीय उपवासाच्या परंपरा नक्की काय सांगतात?
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
Congress election manifesto published Caste wise census
जातनिहाय जनगणना, आरक्षण मर्यादावाढ; काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या केंद्रस्थानी उपेक्षित, महिला 

प्रो कबड्डीच्या सातव्या पर्वाचा लिलाव ८ आणि ९ एप्रिलला होणार आहे. या पाश्र्वभूमीवर १२ संघांनी २९ खेळाडूंना कायम राखले आहे. यू मुंबाच्या बाद फेरीपर्यंतच्या वाटचालीत सिद्धार्थचा सिंहाचा वाटा होता. मात्र तरीही यू मुंबाने त्याला कायम राखलेले नाही. आता लिलावामध्ये चांगली बोली लागेल, याबाबत तो आशावादी आहे.

प्रो कबड्डीच्या सहाव्या हंगामात पाटणा पायरेट्सविरुद्धच्या सामन्यात सिद्धार्थला दुखापत झाली होती. मात्र त्यानंतरही तो सामने खेळला होता. दीड महिन्यापूर्वी त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. आता यातून सावरण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणखी एक महिन्यात मी पूर्णपणे तंदुरुस्त होईन. बेळगावचे फिजिओ डॉ. मोतीलाल यांचे मार्गदर्शन मला मिळत आहे, असे सिद्धार्थने सांगितले.

प्रो कबड्डीच्या सहाव्या हंगामात सिद्धार्थने एकूण २२१ गुणांची कमाई करीत लक्ष वेधून घेतले होते. मात्र रोहा येथे झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत त्याला भारतीय रेल्वे आणि महाराष्ट्र या दोन्ही संघांचे प्रतिनिधित्व करता आले नव्हते. या संदर्भात तो म्हणाला, ‘‘आंतररेल्वे स्पर्धा खेळल्यामुळे मी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळू शकलो नाही. मात्र आता त्या समस्या बाजूला सारून फक्त प्रो कबड्डीच्या आगामी हंगामाकडे लक्ष केंद्रित केले आहे. मागील हंगामामधील चुका सुधारून खेळ आणि कौशल्य सुधारण्याची शास्त्रशुद्ध तयारी सुरू आहे.’’

प्रो कबड्डीचा सहावा हंगाम संपल्यानंतर सिद्धार्थ जेव्हा आपल्या हुंडळेवादी (कोल्हापूर) गावी गेला, तेव्हा त्याचे आयुष्यच जणू पालटले होते. याबाबत तो म्हणाला, ‘‘प्रो कबड्डी संपल्यावर जेव्हा मी माझ्या गावी गेलो, तेव्हा सारेच बदलले होते. मी एक चर्चेतली व्यक्ती झालो असल्याचे मला जाणवते आहे. अनेक समारंभ आणि उद्घाटनाची निमंत्रणे येऊ लागली आहेत.’’