विशाखापट्टणम येथील इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत भारतीय संघाने तिसऱया दिवसाच्या अखेरीस २९८ धावांची आघाडी घेतली आहे. तिसऱया दिवसाच्या खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या ३ बाद ९८ अशी आहे. विराट कोहली ५५ धावांवर, तर रहाणे १९ धावांवर नाबाद आहे. फिरकीपटू अश्विनच्या फिरकीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली. तिसऱया दिवसाच्या दुसऱया सत्रात भारताने इंग्लंडचा पहिला डाव २५५ धावांत गुंडाळला. त्यामुळे भारतीय संघाला २०० धावांची भक्कम आघाडी घेता आली. आर.अश्विनने इंग्लंडच्या पाच खेळाडूंना आपल्या फिरकी जाळ्यात ओढले. शमी, जडेजा, उमेश यादव, जयंत यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

दोनशे धावांची आघाडी मिळाल्यानंतर भारतीय संघाच्या दुसऱया डावाची सुरूवात काहीशी निराशाजनक झाली. दमदार फॉर्मात असलेला मुरली विजय स्वस्तात माघारी परतला. इंग्लंडल्या स्टुअर्ट ब्रॉडने संघाला पहिले यश मिळवून दिले. मुरली विजयपाठोपाठ स्टुअर्ट ब्रॉडने के.एल राहुल  यालाही तंबूत धाडले. चेतेश्वर पुजारा यावेळी अँडरसनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. संघाचे तीन महत्त्वाचे फलंदाज अवघ्या ३० धावांमध्ये माघारी परतल्यामुळे भारतीय संघावर दबाव निर्माण करण्यात इंग्लंडला यश आले होते. पण विराट कोहलीने पुन्हा एकदा कर्णधारी कसब दाखवून मैदानात टीच्चून फलंदाजी केली आणि अर्धशतकी खेळी साकारली. आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कोहली ५५ धावांवर नाबाद राहीला, तर रहाणे कोहलीला साजेशी साथ देऊन १९ धावांवर नाबाद आहे.

तत्पूर्वी, तिसऱया दिवसाच्या  उपहारापर्यंत ६ बाद १९१ अशी धावसंख्या असणाऱया इंग्लंडच्या संघाचा संपूर्ण डाव  दुसऱया सत्रात संपुष्टात आला.  इंग्लंडचे २३४ धावांवर ८ गडी तंबूत परतले. तिसऱया दिवसाच्या पहिल्या सत्रात इंग्लंडच्या बेअरस्टो आणि बेन स्टोक्स यांनी संयमी फलंदाजी करत आपापले अर्धशतक गाठले. दोघांनीही शतकी भागीदारी रचल्यामुळे इंग्लंडच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. बेअरस्टो-स्टोक्स जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरत असताना उमेश यादवने आपल्या भेदक माऱयाने बेअरस्टोला त्रिफळाचीत केले. बेअरस्टोने ५३ धावा केल्या. दुसऱया सत्रात अश्विनने भारतीय संघाला सातवे यश मिळवून दिले. अश्विनच्या फिरकीवर बेन स्टोक्स ७० धावांवर माघारी परतला, तर जडेजाने अन्सारीला स्वस्तात माघारी धाडले. त्यानंतर अश्विनने सामन्याच्या १०३ व्या षटकात आपल्या अफलातून फिरकीवर स्टुअर्ट ब्रॉडला पायचीत केले आणि त्याच्या पुढच्याच चेंडूवर अँडरसन याला शून्यावर माघारी धाडून इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला.

दुसऱया दिवसाच्या अखेरीस इंग्लंडचे पाच फलंदाज तंबूत दाखल झाले होते. भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद ४५५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताच्या फिरकीपटूंनी इंग्लंडची दाणादाण उडवत दिवसाच्या अखेरीस इंग्लंडच्या पाच फलंदाजांना माघारी धाडले आहे. दुसऱया दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडची अवस्था ५ बाद १०३ अशी आहे. इंग्लंडचा संघ अजूनही ३५२ धावांनी पिछाडीवर आहे. आर.अश्विनने आपल्या फिरकी जादूने इंग्लंडच्या दोन फलंदाजांना माघारी धाडले, तर जयंत यादव व मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. दिवसाच्या अखेरीस भारताने सामन्यावर पकड निर्माण केली आहे.

Cricket Score, India vs England- दिवसभरातील अपडेट्स

Live Updates
16:35 (IST) 19 Nov 2016
भारताकडे २९८ धावांची आघाडी, कोहली ५५ धावांवर, तर रहाणे २२ धावांवर नाबाद
16:35 (IST) 19 Nov 2016
तिसऱया दिवसाचा खेळ संपला, भारत ३ बाद ९८ धावा
16:34 (IST) 19 Nov 2016
३४ षटकांच्या अखेरीस भारत ३ बाद ९८ धावा
16:33 (IST) 19 Nov 2016
कोहलीचा डीप मिड विकेटवर खणखणीत चौकार, भारत ३ बाद ९७ धावा
16:25 (IST) 19 Nov 2016
कोहली आंतरराष्ट्रीय कसोटीतील १३ वे अर्धशतक
16:25 (IST) 19 Nov 2016
विराट कोहलीचे ६३ चेंडूत अर्धशतक
16:24 (IST) 19 Nov 2016
विराट कोहलीची पुन्हा एकदा अर्धशतकी खेळी
16:22 (IST) 19 Nov 2016
३१ षटकांच्या अखेरीस भारत ३ बाद ८७ धावा. (कोहली- ४९, रहाणे- १९)
16:15 (IST) 19 Nov 2016
विराट कोहली अर्धशतकाच्या जवळ
16:14 (IST) 19 Nov 2016
मोईन अलीकडून निर्धाव षटक, भारत ३ बाद ८४ धावा
16:08 (IST) 19 Nov 2016
लाँग ऑनवर कोहलीकडून एक धाव, २७ षटकांच्या अखेरीस भारत ३ बाद ७९ धावा.
16:07 (IST) 19 Nov 2016
रहाणेची डीप पॉईंटच्या दिशेने एक धाव
16:06 (IST) 19 Nov 2016
कोहलीकडून स्वेअर लेगवर एक धाव
16:06 (IST) 19 Nov 2016
कोहलीचा शानदार कव्हर ड्राईव्ह, दोन धावा
16:05 (IST) 19 Nov 2016
रशीदच्या षटकात तीन धावा, भारत ३ बाद ७५ धावा
16:02 (IST) 19 Nov 2016
कोहलीचा फाईन लेगच्या दिशेने फटका, तीन धावा
16:01 (IST) 19 Nov 2016
२५ षटकांच्या अखेरीस भारत ३ बाद ७२ धावा. (रहाणे- १६ , कोहली- ३७ )
15:59 (IST) 19 Nov 2016
रहाणेचा शानदार फटका, तीन धावा
15:52 (IST) 19 Nov 2016
कोहलीकडून डीप पॉईंटवर एक धाव, भारत ३ बाद ६७ धावा
15:51 (IST) 19 Nov 2016
रहाणेचा फाईन लेगला फटका, एक धाव
15:50 (IST) 19 Nov 2016
अजिंक्य राहणेचा नजाकती फटका, कव्हर्सच्या दिशेने चौकार
15:49 (IST) 19 Nov 2016
२२ षटकांच्या अखेरीस भारत ३ बाद ६१ धावा. (कोहली- ३४, रहाणे- ८)
15:47 (IST) 19 Nov 2016
कोहलीचा पुन्हा एकदा स्वेअर लेगला फटका, एक धाव
15:46 (IST) 19 Nov 2016
स्वेअर लेगच्या दिशेने कोहलीच्या दोन धावा
15:45 (IST) 19 Nov 2016
रशदीच्या फिरकीवर कोहलीचा खणखणीत फटका, दोन धावा
15:44 (IST) 19 Nov 2016
रहाणेचा शानदार स्वेअर ड्राईव्ह चौकार, भारत ३ बाद ५६ धावा
15:42 (IST) 19 Nov 2016
भारताच्या धावसंख्येचे अर्धशतक, कोहली-रहाणेची संयमी फलंदाजी
15:27 (IST) 19 Nov 2016
पुजारा बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे फलंदाजीसाठी मैदानात
15:26 (IST) 19 Nov 2016
विराट कोहली लाँग ऑनच्या दिशेने शानदार चौकार
15:25 (IST) 19 Nov 2016
अँडरसनने भेदक माऱयाने उडवला पुजारा त्रिफळा
15:22 (IST) 19 Nov 2016
जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर चेतेश्वर पुजारा क्लीनबोल्ड, भारताला तिसरा धक्का
15:19 (IST) 19 Nov 2016
कोहलीचा स्वेअर लेगच्या दिशेने फटका, एक धाव
15:18 (IST) 19 Nov 2016
पुजारा आणि कोहलीची संयमी फलंदाजी, भारत २ बाद ३९ धावा
15:04 (IST) 19 Nov 2016
स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर पुजारा पायचीत झाल्याची अपील, पण पंचांचा नकार
15:00 (IST) 19 Nov 2016
रशीदच्या फिरकीवर कोहलीचा खणखणीत चौकार
14:57 (IST) 19 Nov 2016
विराट कोहलीचा शानदार कव्हर ड्राईव्ह चौकार
14:53 (IST) 19 Nov 2016
भारतीय संघाला दुसरा धक्का, के एल राहुल बाद
14:45 (IST) 19 Nov 2016
मुरली विजय ३ धावांवर माघारी, स्टुअर्ट ब्रॉडने घेतली विकेट
14:44 (IST) 19 Nov 2016
रिव्ह्यूमध्ये मुरली विजय झेलबाद असल्याचे निष्पन्न, भारतीय संघाला पहिला धक्का
14:43 (IST) 19 Nov 2016
इंग्लंडकडून रिव्ह्यूची मागणी, निर्णय तिसऱया पंचांकडे
14:43 (IST) 19 Nov 2016
स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर मुरली विजय बाद झाल्याची इंग्लंडची अपील, पण पंचांचा नकार
14:40 (IST) 19 Nov 2016
लोकेश राहुलचा फाईन लेगच्या दिशेने सुरेख फ्लिक, चौकार
14:38 (IST) 19 Nov 2016
लोकेश राहुलचा रशीदच्या फिरकीवर शानदार चौकार
14:35 (IST) 19 Nov 2016
तिसऱया सत्राच्या खेळाला सुरूवात, लोकेश राहुल स्ट्राईकवर
14:24 (IST) 19 Nov 2016
दुसऱया सत्राच्या अखेरीस भारतीय संघाकडे २०८ धावांची आघाडी
14:24 (IST) 19 Nov 2016
भारतीय संघाच्या दुसऱया डावात ६ षटकांमध्ये ८ धावा. (विजय- ३ , राहुल- १)
13:40 (IST) 19 Nov 2016
भारतीय संघाची इंग्लंडवर २०० धावांची भक्कम आघाडी
13:38 (IST) 19 Nov 2016
आर.अश्विनच्या पाच विकेट्स
13:38 (IST) 19 Nov 2016
जेम्स अँडरसन आल्या पावली माघारी, इंग्लंडचा डाव २५५ धावांत संपुष्टात
13:34 (IST) 19 Nov 2016
इंग्लंडला नववा धक्का, अश्विनच्या फिरकीवर स्टुअर्ट ब्रॉड पायचीत