स्पेनच्या कार्ला सुआरेझ नॅवॅरोने रशियाच्या शारापोव्हाला सरळ दोन सेटमध्ये ६-४, ६-३ असे पराभूत केले. त्यामुळे अमेरिकन खुल्या स्पर्धेतील महिला गटातील अजून एका धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. शारापोव्हाने २०१४ साली अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर अद्याप तिला मोठय़ा लढतींमध्ये यश मिळू शकलेले नाही. त्याशिवाय मरिन सिलीचने बेल्जियमच्या डेव्हिड गॉफिनचा ७-६, ६-२, ६-४ तर जपानच्या केई निशिकोरीने जर्मनीच्या फिलीप कोहलश्रायबेरवर ६-३,६-२,७-५ असे पराभूत केले. नाओमी ओसाकाने अरयना साबालेंकावर ६-३, २-६, ६-४ अशी मात करीत प्रथमच ग्रँडस्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. युक्रेनच्या

लेसिआ सुरेन्कोने झेक प्रजासत्ताकच्या मारकेटा वोन्डरोसोवाला ६-७, ७-५, ६-२ असे पराभूत करुन उपांत्यपूर्व फेरी गाठली असून, तिचा सामना ओसाकाशी होणार आहे.