श्रीलंकेविरुद्ध पुढच्या महिन्यात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी जायबंदी अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनच्या जागी मोमिनुल हकला संधी देण्यात आली आहे. पायाचे हाड दुखावल्यामुळे शकिब या आठवडय़ात ऑस्ट्रेलियाला उपचारासाठी जाणार असल्याने तो या मालिकेत खेळू शकणार नाही. बांगलादेशचा संघ श्रीलंकेत दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार असून यामधील पहिला सामना ८ मार्चला गॉल येथे होणार आहे. संघ : मुशफिकर रहिम (कर्णधार), मोहम्मह महमुदुल्लाह, तमीम इक्बाल, शहरिआर नफीस, अनामुल हक, नइम इस्लाम, नसिर होसेनस सोहाग गाझी, अबुल हसन, रुबेल होसेन, इनामुल हक, जुहुरुल इस्लाम, मोमिनुल हक, शहादाद होसेन आणि रोबिऊल इस्लाम.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 26, 2013 3:35 am