करोना विषाणूने सध्या जगभरात दहशत निर्माण केली आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. भारतातील लोकप्रिय IPL स्पर्धादेखील अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे सारेच खेळाडू घरात आहेत. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचा आणि चेन्नई सुपर किंग्सचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन याने CSK शी व्हिडीओ चॅट करताना धोनीची एक आठवण सांगितली.

IPL : ‘या’ संघासाठी आम्ही दोन-दोन तास ‘प्लॅनिंग’ करतो – रोहित शर्मा

हेडनने IPL च्या तिसऱ्या हंगामात मुंगूस बॅटचा वापर केला होता. त्यावेळी त्या बॅटचा विचित्र आकार चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरला होता. मुंगूस बॅटचा दांडा मोठा होता आणि फटका मारण्याची जागा छोटी होती. त्या बॅटचा वापर करत हेडनने २०१० च्या हंगामात दिल्लीविरूद्धच्या सामन्यात ४३ चेंडूत ९३ धावांची खेळी केली होती. ही बॅट हेडनने वापरू नये असं धोनीने त्याला सांगितलं होतं.

टी २० विश्वचषकाच्या संघात धोनीला स्थान; सुनील शेट्टीने निवडला संघ

“मला धोनीनं सांगितलं होतं की तुला मी आयुष्यात जे हवं ते देईन, पण कृपा करून ती मुंगूस बॅट वापरू नकोस. मी त्या बॅटने गेली दीड वर्षे सराव करत होतो. त्या बॅटने जेव्हा मी फटकेबाजी करायचो, तेव्हा चेंडू २० मीटर जास्त लांब जायचा. मुंगूस बॅट मी दोन-तीन सामन्यांततच वापरली. त्यात मला फलंदाजी करताना खूप मजा आली. पण धोनीने मला सांगितल्यामुळे मी ती बॅट वापरणं सोडून दिलं”, असं हेडन म्हणाला.

हेडनची ‘मुंगूस बॅट’

हेडनने २०१० च्या हंगामात २१.६२ च्या सरासरीने ३४६ धावा केल्या. त्या हंगामाचे विजेतेपद देखील CSK ने मिळवले होते.