News Flash

अर्जुन तेंडुलकरला मुंबईच्या संघात स्थान

१५ सप्टेंबरपासून 'या' स्पर्धेत खेळणार

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेटचा देव या नावाने ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनही आपलं पाऊल क्रिकेटच्या मैदानात ठामपणे उमटवत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई टी-२० लीग स्पर्धेत त्याने आपला ठसा उमटवला. त्यानंतर मुंबईच्या १९ वर्षाखालील संघातही त्याने स्थान मिळवले होते. आता त्याने क्रिकेट कारकिर्दीतील आणखी एक पाऊल टाकले आहे. अर्जुनची मुंबईच्या संघात निवड करण्यात आली आहे. त्याचसोबत IPL मध्ये बंगळुरू संघाकडून पदार्पण करणारा आणि सध्या पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करणारा सर्फराज यालाही संघात स्थान देण्यात आले आहे.

सर्फराझ खान

मुंबईच्या संघाची सोमवारी निवड करण्यात आली. यावेळी अर्जुनला संघात स्थान देण्यात आले आहे. या संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे देण्यात आले आहे. विदर्भामध्ये क्रिकेटच्या मोसमातील सुरुवातीच्या काळात ‘बापुना कप’ ही स्पर्धा खेळवण्यात येते. या स्पर्धेसाठी मुंबईच्या १५ खेळाडूंचा संघ घोषित करण्यात आला. या १५ खेळाडूंमध्ये डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून अर्जुनला स्थान देण्यात आले आहे. ही स्पर्धा ५ सप्टेंबरपासून नागपूरमध्ये होणार आहे. आतापर्यंत ही स्पर्धा २० षटकांची खेळवण्यात येत होती, पण आता यंदाच्या वर्षापासून ही स्पर्धा ५० षटकांची म्हणून खेळवण्यात येणार आहे.

मुंबईचा संघ – सूर्यकुमार यादव (कर्णधार), आदित्य तरे, जय बिस्टा, सर्फराज खान, शुभम रांजणे, रोनक शर्मा, एकनाथ केरकर, सुफियान शेख, आकाश पारकर, शम्स मुलानी, आदित्य धुमाळ, शशांक अटार्डे, आकिब कुरेशी, कृतिक हनागावाडी, अर्जुन तेंडुलकर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 12:32 pm

Web Title: mumbai team arjun tendulkar sarfraz khan bapuna cup team selection vjb 91
Next Stories
1 Video : ‘अरे… माझी बाटली गेली कुठे?’; टेनिस कोर्टवर फेडररची फजिती
2 US Open : भारताच्या सुमित नागलने फेडररला झुंजवले
3 विकासच्या चढायांपुढे बंगालचे प्रयत्न अपुरे
Just Now!
X