इंडोनेशियातील आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या नीरज चोप्राचं मानाच्या Diamond League स्पर्धेत पदक हुकलं आहे. भालाफेकपटूंसाठी मानाची स्पर्धा मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत नीरज चोप्राने अंतिम फेरीत स्थान मिळवलं होतं, मात्र काही गुणांच्या फरकामुळे नीरजला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

पाचव्या फेरीपर्यंत नीरज चोप्राने आपलं तिसरं स्थान कायम राखलं होतं. यामुळे नीरज चोप्राला कांस्यपदक मिळेल अशी आशा सर्वांनी व्यक्त केली होती. मात्र जर्मनीच्या थॉ़मस रोहलरने ८५.७६ मी. लांब भाला फेकत नीरजला धक्का दिला. यानंतर अखेरच्या संघीत नीरजचा भाला ८५.७३ इतकीच मजल मारु शकला. त्यामुळे काही गुणांच्या फरकामुळे नीरजला हातात आलेलं कांस्यपदक गमवावं लागलं. या स्पर्धेत नीरज आपल्या राष्ट्रीय विक्रमाशीही बरोबरी करु शकला नाही.