आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी गव्हर्निंग काऊन्सिलने मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसीच्या नवीन नियमानुसार, कोणत्याही खेळाडूला सामन्यादरम्यान दुखापत झाली तर तो मैदानाबाहेर जाऊ शकतो, आणि त्याच्या बदल्यात दुसऱ्या खेळाडूला संधी मिळू शकते. या नियमाला CONCUSION SUBSTITUTE असं म्हटलं जातं. आयपीएलच्या आगामी हंगामााठीही हा नियम लागू करण्यात येणार आहे. सोमवारी गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. BCCI अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांनी याबद्दल माहिती दिली.

दरम्यान, आयपीएलच्या अंतिम सामन्याबद्दलही सोमवारी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. २९ मार्चपासून तेराव्या हंगामाला सुरुवात होणार असून, अंतिम सामना २४ मे तारखेला मुंबईत खेळवला जाईल. याचसोबत सामन्यांच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नसून, रात्री ८ वाजता सामने खेळवले जाणार आहेत.

काही संघमालकांनी सामने रात्री साडेसात वाजता सुरु करावे अशी मागणी केली होती, मात्र बैठकीत वेळेत कोणताही बदल न करण्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. याचसोबत यंदाच्या हंगामात Double Header सामन्यांची संख्याही कमी करण्यात आलेली असून यंदा केवळ ५ Double Header सामने खेळवले जाणार आहेत.

अवश्य वाचा – IPL 2020 : फायनल रंगणार मुंबईत, ही आहे तारीख