रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला चौथ्या वन-डे सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाने दिलेलं 93 धावांचं आव्हान न्यूझीलंडने दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या पराभवासह रोहित शर्माचा कर्णधार या नात्याने सुरु असलेल्या विजयरथाला आज अखेर खिळ बसला आहे. मार्च 2018 पासून भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सलग 12 सामने जिंकले होते. चौथ्या सामन्यातील पराभवामुळे रोहितची कर्णधार या नात्याने विजयाची मालिका अखेर खंडीत झाली आहे.

अवश्य वाचा – न्यूझीलंडची भारतावर 8 गडी राखून मात, ट्रेंट बोल्ट चमकला

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलंडने भारताच्या डावाला खिंडार पाडलं. ट्रेंट बोल्टने 5 तर कॉलिन डी-ग्रँडहोमने 3 बळी घेतले. एका क्षणापर्यंत धावफलकावर 50 धावा लागायच्या आधी भारताचा निम्मा संघ माघारी परतला होता. त्यामुळे भारत वन-डे क्रिकेटमध्ये आपला नवा निच्चांक नोंदवतो की काय असं चित्र निर्माण झालं होतं. मात्र हार्दिक पांड्याने भारतावर आलेली ही नामुष्की टाळली. मात्र तो ही फारकाळ खेळपट्टीवर तग धरु शकला नाही. अखेर भारताने 92 धावांपर्यंत मजल मारण्यात यश मिळवलं.

अवश्य वाचा – IND v NZ : रोहितच्या प्रगतीचा आलेख चढता, मात्र ऐतिहासिक सामन्यात विक्रमाची संधी गमावली