गेल्या दोन-तीन महिन्यात करोनाच्या तडाख्यामुळे सर्वत्र लॉकडाउन आहे. परिणामी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याचे चित्र आहे. सर्व क्षेत्रातील सेलिब्रिटी आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेत आहेत. बॉलिवूड स्टार आणि क्रिकेटपटू हे यात आघाडीवर आहेत. पण तरीदेखील वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात होणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेची चर्चा रंगू लागली आहे. नुकताच अभिनेता सुनील शेट्टी याने टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा १४ खेळाडूंचा संघ जाहीर केला होता. त्यानंतर आता समालोचक आकाश चोप्रा याने टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा १४ खेळाडूंचा संघ घोषित केला आहे. विशेष म्हणजे या संघात भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि अनुभवी यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी या दोघांना संधी देण्यात आलेली नाही.

धोनीच्या प्लॅनिंगपुढे पॉन्टींगही फिका – माईक हसी

आकाश चोप्राने सलामीवीराच्या जागेसाठी रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांना संघात समाविष्ट केले आहे. रोहित शर्मा २०१३ पासून सलामीवीर म्हणून दमदार कामगिरी करतो आहे. तर राहुलदेखील टी २० मध्ये चांगली कामगिरी करत आहे. शेवटच्या टी २० सामन्यात राहुलच्या २२४ धावा आहेत. रोहित आणि राहुलनंतर आकाश चोप्राने कर्णधार विराट कोहलीला संघात स्थान दिले आहे. तर चौथ्या क्रमांकासाठी त्याने युवा श्रेयस अय्यर तर यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंतला पसंती दर्शवली आहे.

VIDEO : “दाढी पांढरी झाली रे तुझी”; जेव्हा रैना धोनीची टर उडवतो…

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत त्याने हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे दोघांचीही निवड केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शिवम दुबे हा हार्दिक पांड्याच्या जागी संघात आला होता. जेव्हा हार्दिक पांड्या संघात परतला, तेव्हा शिवम दुबेला संघाबाहेर व्हावे लागले होते. पण आकाश चोप्राने त्या दोघांना निवडले आहे. १४ खेळाडूंच्या संघात त्याने तिसरा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा यालाही स्थान दिले आहे. जाडेजाची गेल्या काही महिन्यांतील कामगिरी पाहता त्याची निवड केली आहे.

“सेहवाग कायम सचिन, द्रविडच्या सावलीत लपला”; पाकिस्तानी खेळाडूचं मत

गोलंदाजांच्या यादीत आकाश चोप्राने युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या दोघांना समाविष्ट केले आहे. संघात चहलची जागा नक्की आहे, पण कुलदीपबाबत थोडीशी साशंकता आहे. जर तो चागल्या लयीत नसेल, तर त्याच्या जागी दुसऱ्या एखाद्या फिरकीपटूचा विचार केला जाऊ शकतो. याशिवाय आकाश चोप्राने जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीसह दीपक चहरचाही वेगवान गोलंदाजांमध्ये समावेश केला आहे.

आकाश चोप्रा

आकाश चोप्राने निवडलेला संघ – रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रविंद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, दीपक चहर