करोना विषाणू संसर्गाच्या साथीमुळे भारतीय संघाने दौरा टाळल्यास ऑस्ट्रेलियाला मोठे आर्थिक नुकसान होऊ शकेल. या परिस्थितीत जैव-सुरक्षित अ‍ॅडलेड ओव्हल येथे संपूर्ण कसोटी मालिका खेळण्यास विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ अनुकूल असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिली आहे.

नियोजित क्रि के ट कार्यक्र मपत्रिके नुसार डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चार कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार होता. करोनाच्या साथीमुळे हा दौरा रद्द झाल्यास ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ संघटनेचे दूरचित्रवाणी प्रक्षेपणाद्वारे मिळणाऱ्या ३० कोटी डॉलर्सचे नुकसान होईल. भारताविरुद्धची संपूर्ण कसोटी मालिका अ‍ॅडलेड ओव्हल येथे रिकाम्या स्टेडियमवर खेळवण्यात यावी. या परिसरात एका नव्या हॉटेलची बांधणी के ली जात आहे. त्यामुळे खेळाडूंसाठी ते अधिक सुरक्षित ठरेल, असे मत ऑस्ट्रेलियाचा कसोटी उपकर्णधार ट्रॅव्हिस हेडने गुरुवारी व्यक्त के ले होते. ‘बीसीसीआय’चे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनीही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिके चे संके त दिले आहेत.  ‘परिस्थितीमुळे सर्व सामने एकाच मैदानावर खेळावे लागतील. ऑस्ट्रेलियातील टाळेबंदी उठल्यानंतर तेथील नवे धोरण स्पष्ट होऊ शके ल. परंतु सामने प्रेक्षकांविना होण्याची दाट शक्यता आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी सांगितले.