दक्षिण आफ्रिकेविरोधातील बुधावरी होणाऱ्या सामन्यापासून भारतीय संघाच्या विश्वचषक अभियानाला सुरूवात होत आहे. पहिला सामना सुरू झाल्यानंतर काही क्षणांत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत विराटसेनाला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘खेल भी जीतो और दिल भी’ असे ट्विट करत मोदींनी भारतीय संघाचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

नरेंद्र मोदींचं ट्विट –
‘आजापसून भारतीय संघाचे विश्वचषकाचे अभियान सुरूवात होत आहे. संपूर्ण भारतीय संघाला त्यासाठी शुभेच्छा. ही स्पर्धा चांगले क्रिकेट आणि खिलाडूवृत्तीचे साक्षिदार होईल अशी अपेक्षा. खेळही जिंका आणि सर्वांचे हृदयही जिंका’

पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय गोलंदाजांनी सुरूवातीपासून आफ्रिकेच्या फंलदाजांवर अंकूश ठेवला आहे. वेगवाग गोलंदाज बुमराहनं धोकादाय डी कॉक आणि हाशीम आमलाला बाद करत भारतीय संघाला चांगली सुरूवात करून दिली आहे.