सलामीवीर पृथ्वी शॉ आणि सर्फराज खान यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मोसमापूर्वीच्या सराव शिबिरात निवड करण्यात आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) ३६ खेळाडूंच्या चमूत या दोघांचा समावेश केला आहे.

पायाच्या दुखापतीमुळे १९ वर्षीय पृथ्वीला सध्या वेस्ट इंडिज ‘अ’ संघाविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे हे शिबीर रंगणार असून रोहित शर्मा, अजिंक्य रहाणेसुद्धा शिबिरात सहभागी होणार आहे.