19 February 2020

News Flash

Pro Kabaddi 7 : यू मुम्बाची तेलगू टायटन्सवर मात

यू मुम्बा गुणतालिकेत पाचव्या स्थानावर

प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात यू मुम्बा आणि तेलगू टायटन्स यांच्या सामन्यात पुन्हा एकदा यू मुम्बाने बाजी मारली आहे. कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर झालेल्या सामन्यात यू मुम्बाने तेलगू टायटन्सची झुंज ४१-२७ ने मोडून काढली. या विजयासह यू मुम्बा गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहचली आहे.

पहिल्या सत्रापासून यू मुम्बाने आक्रमक खेळ करत आघाडी घेतली. तेलगू टायटन्सच्या बचावफळीतील कच्च्या दुव्यांचा यू मुम्बाच्या खेळाडूंनी फायदा उचलला. अर्जुन देसवाल, रोहित बालियान यांनी चढाईमध्ये झटपट गुणांची कमाई करत यू मुम्बाला आघाडी मिळवून दिली. मात्र दुसऱ्या बाजूने तेलगू टायटन्सने जोरदार कमबॅक केलं. राकेश गौडा आणि सिद्धार्थ देसाई यांनी काही गुणांची कमाई करत तेलगूची झुंज कायम ठेवली. यामुळे पहिल्या सत्राअखेरीस तेलगूने यू मुम्बाला १५-१५ अशा बरोबरीत रोखण्यामध्ये यश मिळवलं.

दुसऱ्या सत्रामध्ये मात्र यू मुम्बाने आपल्या खेळाची गती वाढवली. चढाई आणि बचावफळीत अष्टपैलू खेळ करत यू मुम्बाने तेलगू टायटन्सला बॅकफूटला ढकललं. बचावफळीत फजल अत्राचलीने सुरेख पकडी करत तेलगू टायटन्सच्या आक्रमणातली हवा काढून घेतली. त्याला संदीप नरवाल आणि सुरिंदर सिंह यांनीही चांगली साथ दिली. यू मुम्बाच्या या झंजावातासमोर तेलगू टायटन्स कमबॅक करु शकली नाही. अखेरीस ४१-२७ च्या फरकाने यू मुम्बाने सामन्यात बाजी मारली.

First Published on September 10, 2019 8:51 pm

Web Title: pro kabaddi season 7 u mumba beat telugu titans psd 91
Next Stories
1 वन-डे क्रिकेटसाठी तयार, मात्र सध्या कसोटीकडेच लक्ष – हनुमा विहारी
2 Video : ऐतिहासिक विजयानंतर अफगाणिस्तानमध्ये चिमुरड्यांचा जल्लोष
3 पवारांच्या बारामतीत रंगणार क्रिकेटची रणधुमाळी
Just Now!
X