पाकिस्तान सुपर लीगच्या २०११ (पीएसएल २०२१) सर्व सहा संघांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) ही स्पर्धा हस्तांतरित करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पत्र लिहिले आहे. पाकिस्तानमध्ये वाढत्या करोना प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर आंशिक लॉकडाऊन होण्याचीही चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान सुपर लीगच्या आयोजनावर शंका आहे.

ईएसपीएनच्या अहवालानुसार पीएसएलच्या संघांनी पीसीबीला स्पर्धा पाकिस्तानमध्ये हस्तांतरित करण्यासाठी पत्र लिहिले आहे. पीसीबी या प्रस्तावाचा आढावा घेत आहे आणि लवकरच याबाबत निर्णय घेईल. खेळाडू आणि अधिकाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाल्यामुळे पीसीबीला ४ मार्चला लीगचा सहावा हंगाम थांबवावा लागला. स्थगित झाल्यानंतर लीगचे ३४ पैकी केवळ १० सामने खेळले गेले. १ जूनपासून ही स्पर्धा पुन्हा सुरू होणार आहे. लीग स्टेज सामने १४ जूनपर्यंत चालतील आणि प्लेऑफ सामने १६ जूनपासून सुरू होतील. २० जून रोजी अंतिम सामन्यासह ही स्पर्धा संपेल.

 

ही स्पर्धा लवकरच यूएईमध्ये हलविण्याबाबत पीसीबीला निर्णय घ्यावा लागेल. २३ मे रोजी, सर्व संघ एकत्र येऊन सात दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करतील. जून महिन्यात तापमान खूप जास्त असल्याने पीएसएल यूएईला हलविले जाईल याची खात्री नाही. टी-२० क्रिकेटसाठी हे कदाचित आदर्श ठिकाण नसेल. स्पर्धेत विदेशी खेळाडू देखील असतील ज्यांना अशा उष्णतेमध्ये खेळण्याची सवय नाही.

भारतात आयपीएलचा १४वा हंगाम स्थगित करण्यात आला आहे. करोनाने बायो बबल भेदल्यामुळे बीसीसीआयला ही स्पर्धा स्थगित करावी लागली. आता या स्पर्धेचे उर्वरित सामने टी-२० वर्ल्डकपनंतर खेळले जातील, अशी चर्चा आहे.