News Flash

राकेश कुमार यु मुंबा संघात

भारताचा कर्णधार राकेश कुमारचा यु मुंबा संघात समावेश करण्यात आला आहे.

प्रो कबड्डी लीगचा तिसरा हंगाम जानेवारीत
स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी लीगचा तिसरा हंगाम पुढील वर्षी जानेवारी महिन्यात बहरणार असून, यात आठ संघांचा सहभाग असेल, अशी माहिती संयोजकांनी दिली आहे. भारताचा कर्णधार राकेश कुमारचा यु मुंबा संघात समावेश करण्यात आला आहे.
प्रो कबड्डीच्या दुसऱ्या हंगामातील २० खेळाडूंचे संघ बदलण्यात आले आहेत. यानुसार मागील हंगामातील सर्वात मौल्यवान खेळाडू मनजीत चिल्लर हा पुणेरी पलटणकडून बंगळुरू बुल्सकडे जाणार आहे. याशिवाय अजय ठाकूरलाही पुण्याच्या संघात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय दीपक हुडा, जसमेर सिंग, सुरजीत नरवाल, धरमराज छेरलाथन, वसिम सज्जड, राजगुरू सब्रम्हण्यम या खेळाडूंचेही संघ बदलण्यात आले आहेत.
अनुप कुमार, काशिलिंग आडके, रविंदर पहल, राहुल चौधरी, सुकेश हेगडे, यान कुन ली, संदीप नरवाल आणि ताई डीऑक ईओम यांचे मात्र संघ कायम ठेवण्यात आले आहे. तिसऱ्या हंगामासाठी १२ अन्य देशांतील २४ खेळाडूंना करारबद्ध करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2015 12:49 am

Web Title: rakesh kumar will play for u mumba team
Next Stories
1 दहशतवादाविरोधात एल्गार
2 व्हिडिओ: सेहवाग, ‘तू जाने ना’ गाणं आणि उत्तुंग षटकार..
3 भारतात खेळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही -शहरयार खान
Just Now!
X