13 December 2017

News Flash

VIDEO: ‘सर जडेजा’चा नवा लूक पाहिलात का?, विराटलाही हसू अनावर

जडेजाचा नवा लूक लय भारी

लोकसत्ता ऑनलाईन | Updated: April 19, 2017 9:34 PM

जडेजाने आपल्या मिशी आणि दाढीला राजपुताना स्टाईल शाही लूक दिलेला पाहायला मिळतो.

भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजा आयपीएलमध्ये सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकला. गेल्या वर्षभरात सततच्या कसोटी मालिकेनंतर जडेजाला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर जडेजाने गुजरात लायन्सच्या संघात पुनरागमन देखील केले. यावेळी जडेजाने सर्वांना सरप्राईज दिले. विश्रांतीनंतर नव्या दमाने पुन्हा एकदा क्रिकेटचे मैदान गाजवण्यासाठी तयार होण्यापूर्वी जडेजाने आपल्या लूकमध्ये बदल केले. जडेजा नव्या लूकसह आयपीएलच्या मैदानात उतरला. जडेजाच्या या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. राजपुत घराणेशाहीचा वारसा लाभलेल्या जडेजाने मिशी आणि वाढलेली दाढी कापली. जडेजाने आपल्या मिशी आणि दाढीला राजपुताना स्टाईल शाही लूक दिलेला पाहायला मिळतो. जडेजाने बदललेल्या आपल्या नव्या लूकचा व्हिडिओ ट्विटर हॅण्डलवर ट्विट देखील केला.

‘मैदानातला खेळ बदलला..सोबत माझा लूकही’, अशा मथळ्यासह जडेजाने आपला राजपुताना लूक शेअर केला. आयपीएल सामन्याच्या निमित्ताने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली आणि जडेजाची मैदानात भेट झाली. त्यावेळी जडेजाचा लूक पाहून विराट कोहली देखील आश्चर्यचकीत झाला. कोहलीला जडेजाचा लूक पाहून हसू अनावर झाल्याचे छायाचित्र देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. यात सनरायझर्स संघाचा गोलंदाज प्रवीण कुमार याला जडेजाचा नवीन लूक दाखवून कोहली खळखळून हसत असल्याचे दिसते. खेळाडूंच्या कामगिरीसोबत त्यांच्या नवनव्या लूक्सचीही लोकप्रियता गेल्या काही वर्षांमध्ये वाढताना दिसते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या वाढलेली दाढी आणि मोठ्या मिशा ठेवण्याचा ट्रेंड सुरू आहे. जडेजा देखील ट्रेंडमध्ये सामील झाला असून आता मिशांना ताव देणारा जडेजा चाहत्यांना पाहायला मिळेल.

First Published on April 19, 2017 9:34 pm

Web Title: ravindra jadeja new look virat kohli laughter rajputana look ipl