18 September 2020

News Flash

रिकी डॉनिसनची हॅट्ट्रिक

नयन आणि मृणाल चॅटर्जी बंधूंनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय स्थान पटकावले.

 

पाऊस नसल्याने तयार झालेले उष्ण आणि दमट वातावरण याचप्रमाणे मोठय़ा प्रमाणावर जमलेल्या दर्दी चाहत्यांच्या साक्षीने कोल्हापूरात कार्टिगचा थरार रंगला. ‘व्रूम व्रूम’च्या तालमय नादासह देशभरातल्या शर्यतपटूंनी उपस्थितांची मने जिंकली. यंदाच्या हंगामात झंझावती फॉर्ममध्ये असणाऱ्या रिकी डॉनिसनने दिमाखदार कामगिरी कायम राखत वरिष्ठ गटात जेतेपदावर नाव कोरले. त्याने ही शर्यत १७ मिनिटे आणि २० सेकंदांत पूर्ण केली. नयन आणि मृणाल चॅटर्जी बंधूंनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय स्थान पटकावले.

निकाल :

वरिष्ठ गट

१. रिकी डॉनिसन (बीपीसी रेसिंग), २. नयन चॅटर्जी (मेको रेसिंग), ३. मृणाल चॅटर्जी (मेको रेसिंग)

कनिष्ठ गट

१. मानव शर्मा (बीपीसी रेसिंग) २. चिराग घोरपडे (बीपीसी रेसिंग), ३. जोनाथन कुरिआकोसे (रायो रेसिंग)

कुमार गट

१. रुहान अल्वा (बीरेल आर्ट), २. शहान अली मोहसीन (मेको रेसिंग), ३. अर्जुन नायर (मेको रेसिंग)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2016 1:52 am

Web Title: ricky donison win jk tyre max karting championship
Next Stories
1 Cricket Score India vs New Zealand : भारत विजयापासून ६ विकेट्स दूर
2 सानिया-बाबरेराला जेतेपद
3 कबड्डीचे वास्तव.. शोध आणि बोध!
Just Now!
X