IND vs AUS : यष्टीमागे ऋषभ पंतला अनेकदा आपण प्रतिस्पर्धी फलंदाजाला बोलताना किंवा गोलंदाजाला मार्गदर्शन करताना पाहतो. यष्टीमागील चर्चेचा किंवा बोलण्याचा आवाज स्टम्प माइकमध्ये रेकॉर्ड होतो. चौथ्या कसोटी सामन्यादरम्यानही ऋषभ पंत एक भोजपुरी गाणं गात असतानाचा आवाजही स्टम्प माइकमध्ये रेकॉर्ड झालाय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी यावरुन पंतला ट्रोल करत आहेत.

२३ वर्षीय ऋषभ पंत यष्टीमागे ‘स्पायडरमॅन स्पायडरमॅन, तुने चुराया मेरा दिल का चैन’ हे भोजपुरी गाणं गात असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन आणि कॅमरुन ग्रीन फलंदाजी करत आहेत. समालोचकाचा आवज येत आहे. यामध्ये ऋषभ पंत स्पायडरमॅन हे भोजपूरी गाण गात असल्याचा आवाज ऐकू येतोय.

आणखी वाचा- चौथा कसोटी सामना राहणार अनिर्णित; गुगलनं दिला कौल

प्रतिस्पर्धी फलंदाजाचा फलंदाजीदरम्याना संयम तुटण्यासाठी ऋषभ पंत प्रत्येकवेळा नवनव्या आयडियाचा वापर करत असतो. कदाचीत त्यापैकीच हा एक प्रयत्न असू शकतो.

पाहा व्हिडीओ –

आणखी वाचा- सिराजचा ऑस्ट्रेलियाला ‘पंच’; जहीरच्या विक्रमाची केली बरोबरी

शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांच्या प्रभावी गोलंदाजीपुढे ब्रिस्बेन कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियानं २९४ धावांपर्यंत मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे चौथ्या कसोटीत ऐतिहासिक विजयासाठी भारतीय संघाला ३२८ धावांची आवशकता आहे. चौथ्या दिवसाचा उर्वरित खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. सामना थांबवण्यापूर्वी दुसऱ्या डावात भारतानं नाबाद चार धावा केल्या आहेत. भारतीय संघ अद्याप ३२४ धावांनी पिछाडीवर आहे.  बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सध्या १-१ बरोबरीत आहे. पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियानं तर तुसऱ्या सामन्यात भारतानं विजय मिळवला होता. तिसरा कसोटी सामना भारतीय संघान अनिर्णीत राखला होता. त्यामुळे अखेरच्या कसोटी सामन्यात विजय मिळवून चषकावर नाव कोरण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल.