22 January 2021

News Flash

IND vs AUS: रोहित-गिल जोडीचा पराक्रम! ५३ वर्षांनी जुळून आला ‘हा’ योगायोग

वाचा नक्की काय केली कामगिरी

भारतीय संघाला चौथ्या डावात ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ४०७ धावांचे आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. पण पहिल्या डावाप्रमाणेच खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर दोघेही बाद झाले. पहिल्या डावात रोहित लवकर बाद झाला होता, तर दुसऱ्या डावात गिलने लवकर तंबूचा रस्ता धरला. असे असले तरी या जोडीने एक दमदार पराक्रम केला.

रोहित-गिल जोडीने पहिल्या डावात ७० धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात पुन्हा एकदा या जोडीने संघाला शांत आणि संयमी सुरूवात मिळवून दिली. पण दुर्दैवाने ७१ धावांच्या भागीदारीनंतर शुबमन गिल बाद झाला. त्याने ३१ धावांची खेळी केली. याचसोबत भारतीय सलामीवीरांनी दोन्ही डावात ५०+ भागीदारी करण्याची ही ऑस्ट्रेलियातील ही केवळ दुसरीच वेळ ठरली. तब्बल ५३ वर्षांनी असं घडलं. याआधी १९६८ मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना एकाच सामन्यात दोन्ही वेळा भारतीय सलामीवीरांनी अर्धशतकी सलामी दिली होती. त्यानंतर आज रोहित-गिल जोडीने हा पराक्रम करून दाखवला.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटीत चौथ्या दिवसअखेर सामना अतिशय रंगतदार अवस्थेत असून भारतीय संघाने दिवसअखेर २ बाद ९८ धावांपर्यंत मजल मारली. आजच्या दिवसाच्या खेळात स्टीव्ह स्मिथ, लाबूशेन आणि ग्रीन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ३१२ धावांवर डाव घोषित केला आणि भारताला मोठं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने खेळ संपेपर्यंत रोहित शर्मा आणि शुबमन गिलचा बळी गमावला. सध्या अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा मैदानावर आहेत. सामन्याच्या उवर्रित एका दिवसाच्या खेळात विजयासाठी भारताला ३०९ धावांची तर ऑस्ट्रेलियाला ८ बळींचाी आवश्यकता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2021 1:21 pm

Web Title: rohit sharma shubman gill becomes first ever opening pair in last 50 years to score 50 partnerships in both innings vjb 91
Next Stories
1 रोहितचं अर्धशतक अन् भारताला दोन धक्के; सामना रंगतदार स्थितीत
2 शिवीगाळ करुन करिअर संपवण्याची धमकी, क्रिकेटपटूच्या आरोपाने खळबळ
3 भारत ४४ वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक कामगिरीची पुनरावृत्ती करणार?
Just Now!
X