ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर भारताने २ बाद ९६ धावा केल्या. अनुभवी स्टीव्ह स्मिथचे शतक (१३१) आणि मार्नस लाबूशेन, विल पुकोव्हस्कीची अर्धशतके यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३८ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाला प्रत्युत्तर देताना रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी भारताला चांगली सुरूवात मिळवून दिली. पण खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर हे दोघे माघारी परतले. रोहितने फार मोठी धावसंख्या उभारली नाही, पण त्याच्या छोट्या खेळीत त्याने एक धमाकेदार विक्रम केला.

दौऱ्यावरील आपला पहिलाच सामना खेळणारा रोहित शर्मा याने शुबमन गिलसोबत ७० धावांची दमदार भागीदारी केली. रोहितने ७७ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार लगावत २६ धावा केल्या. डावाच्या १६व्या षटकात रोहित शर्मा फलंदाजी करत असताना फिरकीपटू नॅथन लायन गोलंदाजीसाठी आला. रोहितने त्याच्या चेंडूवर पुढे येऊन सरळ रेषेत उत्तुंग षटकार लगावला. या षटकारासह त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध १०० षटकार पूर्ण केले. टी२०, वन डे आणि कसोटी असे तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून ऑस्ट्रेलियाविरूद्ध १०० षटकार ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला.

d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Mumbai Indians Vs Delhi Capitals Delhi Capitals Match Updates in Marathi
MI vs DC : रोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रचला इतिहास, ‘हा’ विक्रम करणारा विराट कोहलीनंतर ठरला दुसराच खेळाडू
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’

आणखी वाचा- IND vs AUS: स्मिथ = भारताची डोकेदुखी!! शतक ठोकत केला नवा विक्रम

रोहितने ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना वन डे मध्ये ६३ षटकार ठोकले आहेत. ऑस्ट्रेलियाविरूद्ध वन डे मध्ये इतके षटकार इतर कोणत्याही खेळाडूने मारलेले नाहीत. आज कसोटीतील षटकार मारत रोहितने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ४२४वा षटकार लगावला. सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच्याएवढे षटकार कोणत्याही खेळाडूच्या नावे जमा नाहीत.

आणखी वाचा- IND vs AUS: आज की नारी….!! कसोटी सामन्यात पहिल्यांदाच घडली ‘ही’ गोष्ट

दरम्यान त्याआधी, पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे डावावर वर्चस्व होते. सलामीवीर पुकोव्हस्की आणि मार्नस लाबूशेन यांनी अर्धशतके ठोकली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र भारतीय गोलंदाजांनी यजमानांना स्वस्तात रोखलं. स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन दोघे चांगला खेळ करत होते. पण लाबूशेन ९१ धावांवर बाद झाल्यावर स्मिथने एकट्याने बाजू लावून धरली. लाबूशेननंतरच्या सर्व फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन चाहत्यांची निराशा केली. मॅथ्यू वेड (१३), कॅमेरॉन ग्रीन (०), टीम पेन (१), पॅट कमिन्स (०), नॅथन लायन (०) हे सारे फलंदाज स्वस्तात परतले. मिचेल स्टार्कने फटकेबाजी करत २४ धावा केल्या. जाडेजाने ४, बुमराह व सैनीने २-२ तर मोहम्मद सिराजने १ बळी टिपला.