टीम इंडियाची ‘रनमशीन’ असणाऱ्या विराट कोहलीची मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी होत असलेली तुलना योग्य नसल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने व्यक्त केले आहे. मेलबर्न मैदानावर झालेल्या चर्चेदरम्यान रिकी पाॅन्टींगने सचिन आणि विराट कोहलीच्या तुलनेवर नाराजी व्यक्ती.

सचिन तेंडुलकर जेव्हा क्रिकेट करियरच्या अखेरीस खेळत होता तेव्हा भारतीय कर्णधार विराट कोहलीने क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. प्रत्येकजण विराटची तुलना मास्टर ब्लास्टरसोबत करत आहे. पण विराट कोहली सचिनप्रमाणे दहा ते १५ वर्षे क्रिकेटमध्ये आधीराज्य गाजवतो का? हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे. सचिनने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वोच्च खेळ केला आहे. आणि हेच एखाद्या चॅम्पियनची निशाणी आहे. २०० कसोटी सामने खेळणे साधीसुधी गोष्ट नाही. मी ही १६८ कसोटी सामने खेळलो आहे, पण दोनशे कसोटी खेळण्याची गोष्टच वेगळी आहे.

विराट कोहलीने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. पण यापुढे तो क्रिकेटमध्ये सातत्य ठेवतो का? हे पहावे लागेल. विराट कोहलीने क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर त्याची सचिनशी तुलना करणे योग्य आहे. सचिन सचिन आहे आणि विराट विराट. त्यामुळे दोघांची तुलना तूर्तास तरी टाळावी, असे तो म्हणाला.

विराट कोहलीने ७१ कसोटी सामन्यात २३ शतकांसह ६१४७ धावा केल्या आहेत. तर सचिनने २०० कसोटी सामन्यात ५१ शतकांसह १५९२१ धावांचा डोंगर उभा केला आहे. सचिन तेंडुलकरने ४६३ एकदिवसीय सामन्यात ४९ शतकांसह १८४२६ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने २११ एकदिवसीय सामन्यात ३५ शतकांसह ९७७९ धावा केल्या आहेत.