अर्जुन तेंडुलकर क्रिकेटच्या मैदानामध्ये मोठा पराक्रम करण्यापूर्वीच सतत चर्चेत असतो. सचिन तेंडुलकरचे क्रिडा विश्वात असलेल्या नावामुळे अर्जुन तेंडुलकरच्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे सर्वांचे लक्ष असते. त्यामुळे कधीकधी अर्जुन तेंडुलकर तो दबाव झेलू शकतो का? असा प्रश्न आपल्याला पडला असेल. पण खुद सचिन तेंडुलकरने याचा खुलासा केला आहे.

सचिन तेंडुलकरला अर्जुनवर पुर्ण विश्वास आहे. तो म्हणतो की, क्रिकेटमध्ये अडथळे येत राहतात. पण प्रत्येक अडथळ्याचे चक्रव्यूह भेदण्यास अर्जुन सज्ज आहे. त्याला माहित आहे प्रत्येक अडथळा कसा पार करायचा. मी एक क्रिकेटर म्हणून अर्जुनला कधीही जज करणार नाही. त्याच्या क्रिकेट करियरमध्ये मी दखल देणार नाही, त्याने क्रिकेटचा पूर्ण आनंद घ्यावा असे मला वाटते.

अर्जुनला पूर्णपणे स्वतंत्र्य दिले आहे. त्याच्या कोणत्याही निर्णयात मी दखल देत नाही. क्रिकेटचे सर्व निर्णय तो स्वत: घेतो आणि त्यात मी कोणताही दखल देत नाही. तो खेळाप्रती निष्ठावंत राहिला तर सर्व अडचणीवर मात करत त्याचा रस्ता तोच बनवेल असेही सचिन म्हणाला.
दरम्यान, अर्जुन तेंडुलकरने नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यामध्ये अंडर-१९ च्या भारतीय संघामध्ये पदार्पण केले होते. या दौऱ्यामध्ये अर्जुन आपला ठसा उमटवण्यात अपयशी ठरला होता. अर्जुनला दोन सामन्यात फक्त तीन विकेट घेता आला.