देशभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. जवळपास दोन महिन्यांच्या लॉकडाउनमुळे सारेच कंटाळले आहेत, पण करोनाचा फैलाव रोखण्यासाठी घराबाहेर न पडणे तितकेच गरजेचे आहे. हळूहळू लॉकडाउनबाबतचे नियम शिथिल केले जात आहेत, पण अद्याप करोनाचा धोका टळला नसल्याने शक्य तितकी काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. अशा परिस्थितीमध्ये घरात बसून कंटाळलेले क्रिकेटपटू एकमेकांना घरातच चॅलेंज देत आहेत.

भारताचा माजी खेळाडू युवराज सिंग याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आधी Keep it up चॅलेंज दिलं होतं. ते सचिनने पूर्ण केलं. त्यानंतर युवराजने पुन्हा एकदा सचिनला आव्हान दिलं. मैदानाच्याऐवजी स्वयंपाकघरात शतक ठोकून दाखव असं आव्हान सचिनला युवराजने दिलं. स्वयंपाकघरात पोळी लाटण्यासाठी वापरण्यात येणारं लाटणं आणि चेंडू याच्या सहाय्याने १०० वेळा चेंडू किप इट अप चॅलेंजप्रमाणे उडवून दाखव, असं हे चॅलेंज होतं.

सचिनने त्यावर झकास उत्तर दिलं. “मी दिलेल्या आधीच्या चॅलेंजचं उत्तर तू खूप मस्त दिलंस. विशेष म्हणजे त्या चॅलेंजसाठी तू स्वयंपाकघरात जाऊन लाटण्याने चेंडू उडवलास. पण मित्रा, जेव्हा कोणी स्वयंपाकघरात असतं आणि हातात लाटणं असतं तेव्हा त्याने लोकांना पराठे खायला घालावेत. माझ्याकडे दही आणि लोणचं आहे, फक्त डिश रिकामी आहे. लवकर मला पराठे पाठवून दे”, असं धमाल उत्तर सचिनने दिलं.

 

View this post on Instagram

 

Yuvi paranthe kithe hai?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on

त्याआधी युवराजने सचिन तेंडुलकरला किप इट अप चॅलेंज दिलं होतं. बॅट उभी धरून बॅटेच्या कडेने (edge) चेंडू शक्य तितक्या वेळा टोलवत राहणे, असा हा चॅलेंज आहे. युवराजने स्वत: घराच्या टेरेसवर हे चॅलेंज पूर्ण करून मग पुढे सचिनला आव्हान दिलं होतं.

त्यावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हे चॅलेंज सहज पूर्ण केलं होतं. सचिनने तर हे चॅलेंज चक्क डोळ्यावर पट्टी बांधून पूर्ण केलं होतं. पोस्ट केलेल्या व्हि़डीओमध्ये सचिनने डोळ्यावर बांधलेल्या काळ्या पट्टीचं रहस्यदेखील युवीला सांगितलं होतं.