News Flash

अभिनंदन यांच्या घरवापसीवर सचिनचा खास संदेश

शुक्रवारी रात्री अभिनंदन भारतात दाखल

(संग्रहित छायाचित्र)

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडक अभिनंदन वर्थमान अखेरीस आपल्या मायदेशात दाखल झाले. शुक्रवारी रात्री पाकिस्तानी सैन्याने वाघा बॉर्डरवर अभिनंदन यांना भारतीय सैन्याकडे सोपवलं. अभिनंदन यांच्या घरवापसीनंतर देशभरातून आनंद व्यक्त करण्यात येतो आहे. भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवर खास संदेश लिहीत अभिनंदन यांचं स्वागत केलं आहे.

सचिनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ” HERO, हे फक्त चार शब्द नाहीत. या चार शब्दांपेक्षा HERO फार मोठा असतो. हिरो तो असतो जो तुम्हाला स्वत:वर विश्वास ठेवायला शिकवतो. #WelcomeHomeAbhinandan Jai Hind. ”

याआधी बीसीसीआयनेही अभिनंदन यांच्या घरवापसीनंतर खास ट्विट करत त्यांचं स्वागत केलं होतं.

अवश्य वाचा – मायदेशी परतलेल्या अभिनंदन यांचा BCCI कडून सन्मान

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2019 3:45 pm

Web Title: sachin tendulkar welcomes abhinandan with special message on his twitter account
टॅग : Sachin Tendulkar
Next Stories
1 विश्वचषकात धोनीचं संघात असणं विराटसाठी फायद्याचं – सुनील गावसकर
2 केदार जाधव-धोनीच्या खेळापुढे कांगारु बेजार, भारत 6 गडी राखून विजयी
3 भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका : भारत पराभवाचा वचपा काढणार?
Just Now!
X